गणवेशाची रक्कम ‘डीबीटी’ अंतर्गत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 11:35 PM2017-12-17T23:35:58+5:302017-12-17T23:36:15+5:30
सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मोफत शालेय गणवेश योजनेचा थेट लाभ हस्तांतरण करण्यात आले असून संबधित गट शिक्षणाधिकाºयांना सदर योजनेची अंमलबजावणी डीबीटीनुसार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मोफत शालेय गणवेश योजनेचा थेट लाभ हस्तांतरण करण्यात आले असून संबधित गट शिक्षणाधिकाºयांना सदर योजनेची अंमलबजावणी डीबीटीनुसार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शासनाकडून विद्यार्थ्यांना विविध योजनेचा दिला जाणार आर्थिक लाभ, वस्तू आता डीबीटी अंतर्गत दिला जाणार आहे. मोफत गणवेश योजनेचा निधी लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावरच वर्ग केला जाणार आहे. शासन निर्णयानुसार लाभार्थी विद्यार्थी-विद्यार्थिनींना वस्तूची खरेदी करून त्याची पावती सादर केल्यानंतरच लाभाची रक्कम बँक खात्यात जमा केली जाणार आहे. शासनाच्या योजने अंतर्गत नक्की वस्तू खरेदी करण्यात आली आहे का? याबाब खात्रीसाठी शासनाकडून सदर निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षण विभागाने सांगितले. शैक्षणिक वर्ष संपत आले तरी, अद्याप अनेक विद्यार्थ्यांच्या हाती अद्याप गणवेश पडले नाहीत. त्यामुळे पालकांतून संताप व्यक्त होत आहे. तर काहींनी गणवेश योजनेचा लाभच नको असे म्हणत याकडे पाठ फिरवली आहे. विशेष म्हणजे सदर योजना प्रभावीपणे राबविताना संबधित तालुक्याच्या गट शिक्षणाधिकाºयांनीही दिरंगाई केली. विद्यार्थ्यांची बँकेत खातेच उघडली गेली नाहीत. त्यामुळे शालेय विद्यार्थी अद्याप गणवेश योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. शासनाकडून आलेल्या सूचनांचे पालनच केले जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे. गणवेश योजना प्रभावीपणे अंमलबजावणीकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे.
गट शिक्षणाधिकारी : योजनेचा अहवाल
मोफत गणवेश योजने अंतर्गत अनेक शाळेतील विद्यार्थी अजूनही वंचित आहेत. आता संबधित तालुक्याच्या गट शिक्षणाधिकाºयांना सर्व शिक्षा कडून परत एकदा डीबीटी अंतर्गत योजना अंमलबजावणीचे पत्र १४ डिसेंबर रोजी पाठविण्यात आले आहेत. शिवाय अहवालही सादर करण्याच्या सूचना संबधित गट शिक्षणाधिकाºयांना देण्यात आल्या आहेत. सदर अहवालात गणेवशासाठी असणारी पात्र विद्यार्थी संख्या, बँक खाते उघडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या यासह योजनेची माहिती तत्काळ जिल्हा कार्यालयात सादर करण्याच्या सूचना आहेत.
पालकांचे बँक खाते
विद्यार्थी व आई यांच्या संयुक्त खात्याचा आग्रह न धरता, आई-वडील किंवा पालकांच्या वैक्तीक आधार संलग्न खात्यावर गणेवशाची रक्कम वर्ग करण्यात येणार आहे.