भूमिगत वीज वाहिनीचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2018 11:59 PM2018-06-05T23:59:02+5:302018-06-05T23:59:02+5:30

महावितरणकडून लवकरच हिंगोली शहरात भूमिगत वीज वाहिनीचे काम हाती घेतले जाणार आहे. हिंगोली शहरातील विद्युत महावितरण कार्यालयापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत भूमिगत वीजजोडणीचे काम केले जाणार असून सर्वेक्षणाची कामे पूर्ण झाली आहेत. भूमिगत वीजवाहिनीच्या कामांसाठी १ कोटी २८ लाख रूपये खर्च केला जाणार आहे.

 Underground electricity channel survey | भूमिगत वीज वाहिनीचे सर्वेक्षण

भूमिगत वीज वाहिनीचे सर्वेक्षण

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : महावितरणकडून लवकरच हिंगोली शहरात भूमिगत वीज वाहिनीचे काम हाती घेतले जाणार आहे. हिंगोली शहरातील विद्युत महावितरण कार्यालयापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक पर्यंत भूमिगत वीजजोडणीचे काम केले जाणार असून सर्वेक्षणाची कामे पूर्ण झाली आहेत. भूमिगत वीजवाहिनीच्या कामांसाठी १ कोटी २८ लाख रूपये खर्च केला जाणार आहे.
वीज ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठा व्हावा यासाठी महावितरणकडून विविध उपाययोजना केल्या जातात. त्या अनुषंगाने वर्दळीत बाजाराच्या ठिकाणी महावितरणच्या वीजतारांचा गुंता सर्वांनाच माहित आहे. अनेकदा वीजतारांचे घर्षण होऊन आगीच्या दुर्घटना घडतात. शिवाय पावसामुळेही वारंवार बिघाड होतो. आता गर्दीच्या ठिकाणी असलेल्या विद्युत खांबावरील वीजतारा नागरिकांना दिसणार नाहीत. हिंगोली शहर सुशोभिकरणच्या दृष्टिकोनातून व गर्दीच्या ठिकाणी वीजतारा उघड्या राहू नयेत, यासाठी आता हिंगोली शहरात भूमिगत वीज वाहिनीचे येत्या पंधरा दिवसांत सुरू केले जाणार आहे. सदर कामासाठी लागणारी परवानगी, सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे, अशी माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता सुधाकर जाधव यांनी दिली. तसेच महावितरण व नगरपालिका हे काम पूर्ण करण्यासाठी नियोजन करणार आहे.
महावितरणच्या ग्राहकांना वीजबील दुरुस्ती करण्यास अडचण होऊ नये व ही प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्या निर्देशानुसार महावितरणने ग्राहकांच्या वीजबिलांची दुरुस्ती प्रक्रिया
आॅनलाईन केली आहे. या प्रक्रियेत ग्राहकांना राज्यातील महावितरणच्या कुठल्याही कार्यालयात आपली तक्रार दाखल करता येणार असून सदर तक्रार निश्चित कालमर्यादेत सोडविण्यात येणार आहे. शिवाय याबाबत वीजग्राहकांना एसएमएसही पाठविण्यात येईल.
ग्राहकांना वीज बिलासंबंधीची तक्रार लेखी, महावितरण मोबाईल अ‍ॅप, ईमेल व ट्विटर इत्यादी माध्यमांतून मुंबई मुख्यालयासह महावितरणच्या कुठल्याही कार्यालयात करता येणार आहे.
वीजपुरवठा सुरळीतसाठी विद्युत उपकेंद्र; ३ कोटी खर्च
४हिंगोली शहरातील वारंवार होणाऱ्या वीजपुरठा खंडितपासून हिंगोलीकरांची लवकरच सुटका होणार आहे. शहरात वीजपुवठा सुरळीत व्हावा यासाठी आता महावितरणने नवीन ३३ के व्ही विद्युत उपकेंद्र उभारले आहे. नवीन खाकीबाबा सबस्टेशनची काम पूर्ण झाले आहे. रेल्वे पटरीच्या पलीकडील विजेचा दाब आता कमी आदर्श महाविद्यालयाजवळील उपकेंद्रावर असेल. तर रेल्वेपटरी अलीकडील शहराचा भाग महावितरणच्या कार्यालयातील खाकीबाबा ३३ केव्ही उपकेंद्रावर राहणार आहे. ३ कोटी रूपये खर्च करून सबस्टेशनचे कामकाज करण्यात आले.

Web Title:  Underground electricity channel survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.