उघड्यावर शौच करणाऱ्यांना दिला समज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:35 AM2021-02-17T04:35:58+5:302021-02-17T04:35:58+5:30
हिंगाेली : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत १६ फेब्रुवारी सकाळी ५.४५ वा. हागणदारी मुक्त झालेल्या गावांना ...
हिंगाेली : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत १६ फेब्रुवारी सकाळी ५.४५ वा. हागणदारी मुक्त झालेल्या गावांना भेटी देण्यासाठी गटविकास अधिकारी बेले यांच्या मार्गदर्शनाखाली गुड मार्निंग पथक स्थापन करण्यात आला. हत्ता येथे मंगळवारी पथक दाखल झाले असून सकाळी उघड्यावर शौचास जाणाऱ्या नागरिकास समज दिला. तसेच त्यांना गुलाब देऊन स्वागत केले.
गावात नागरिकांनी शौचालय बांधले खरे, परंतु वापरण्यासाठी टाळाटाळ करून विविध कारण समोर करताना सक्षात्कार झाला.
हागणदारीमुक्तसाठी दररोज परिश्रम करणाऱ्या आदर्श व्यतिमत्त्व पंढरी लक्ष्मण वाणी व गंगाराम रामजी ठोके यांचे पथकप्रमुख कोकाटे यांनी कौतुक केले.
यावेळी एम. के. कोकाटे यांनी शौचालय महत्त्व व वापर करण्यासंदर्भात गृहभेटी देत जनजागृती केली. यावेळी जिल्हा समनव्यक शामसुंदर मस्के, बी. आर. सी. सुरेश आघम, सहायक ग्रामसेवक, नामदेव गाढवे, चव्हाण, शिंदे व गावातील नवनिर्वाचित सरपंच रतनबाई दत्तराव गडदे, आकाश गडदे, उपसरपंच नारायण गादेकर, तसेच माजी सरपंच गादेकर सामाजिक कार्यकर्ते हक्कीम, पं. स. सदस्य मानवतकर, ग्रामसेवक तुकाराम साठे, आशा वर्कर संगीता इंगोले, आशा ठोके, मीरा मस्के, उषा ठोके, अंगणवाडी जया ठोके, शीला हिमगिरे, ग्रामपंचायत कर्मचारी वजीर शाह, पंडित, ज्ञानेश्वर कांबळे इतर कर्मचारी व गावकरी उपस्थित होते. फाेटाे नं.१८