पोलीस भरतीसाठी बेरोजगारांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2018 12:43 AM2018-02-06T00:43:59+5:302018-02-06T00:44:29+5:30
जिल्ह्यात यंदा राज्य राखीव दल अथवा पोलीस दलामध्ये भरती होणार नसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस भरतीची तयारी करणाºया बेरोजगार युवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आपल्या भावना व्यक्त केल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात यंदा राज्य राखीव दल अथवा पोलीस दलामध्ये भरती होणार नसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस भरतीची तयारी करणाºया बेरोजगार युवकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आपल्या भावना व्यक्त केल्या.
गेल्या वर्षी हिंगोली जिल्ह्यात १७ पदे रिक्त असतानाही तेवढ्या पदांसाठी भरतीची प्रक्रिया झाली होती. यावर्षी राज्य राखीव दलात २४ पदे रिक्त असतानाही भरतीची प्रक्रिया होणार नसल्याचे या उमेदवारांना कळाले आहे. त्यांनी सांगितले की, शासन व प्रशासनाने किमान ३0 पेक्षा कमी रिक्त पदे असलेल्या जिल्ह्यांमध्ये भरती घेण्यात येणार नसल्याचे जाहीर केले आहे. अशा ६ जिल्ह्यांपैकी हिंगोलीही एक आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या प्रमाणात नवीन भरतीची जाहीरात काढण्याची मागणी जिल्हाधिकाºयांना देण्यात आलेल्या निवदेनाद्वारे करण्यात आली आहे. जवळपास तीनशे ते चारशे युवक या मागणीसाठी अचानक एकत्र आल्याचे चित्र पहायला मिळाले.