नागनाथ मंदिर परिसरात दुर्दैवी घटना; अंगावर लोखंडी गेट पडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 10:45 AM2023-07-25T10:45:43+5:302023-07-25T10:46:55+5:30

नागनाथ मंदिराच्या पूर्व दिशेला असलेले लोखंडी गेट अंगावर पडून बारा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Unfortunate incident in Nagnath temple area; A 12-year-old boy died after an iron gate fell on him | नागनाथ मंदिर परिसरात दुर्दैवी घटना; अंगावर लोखंडी गेट पडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू

नागनाथ मंदिर परिसरात दुर्दैवी घटना; अंगावर लोखंडी गेट पडून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू

googlenewsNext

औंढा नागनाथ : शहरातील नागनाथ मंदिराच्या पूर्व द्वारामोरील पत्राच्या शेडला लावलेले लोखंडी गेट अंगावर पडून एका बारा वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. सोमनाथ अरुण पवार असे मृत मुलाचे नाव आहे. ही घटना आज सकाळी ६ वाजे दरम्यान घडली. 

पूर्व द्वार सध्या बंद असल्याने इकडे भाविक जात नाहीत. त्यामुळे या ठिकाणी काही मुले खेळत असतात. दरम्यान, आज सकाळी गेट पडून त्याखाली सोमनाथ दबला गेल्याची माहिती आसपासच्या मुलांनी परिसरातील नागरिकांनी दिली.  यानंतर घटनास्थळी नागरिक आणि पोलीस निरीक्षक गणपत राहिरे ,अफसर पठाण ,अमोल चव्हाण मंदिर कर्मचारी व मुलाचे नातलग दाखल झाले.

मात्र, तोपर्यंत अवजड लोखंडी गेट खाली दबून सोमनाथ याचा जागीच मृत्यू झाला. त्याचा मृतदेह अवजड गेट उचलून बाहेर काढण्यात आला. यावेळी नातलगाच्या रडण्याने परिसर स्तब्ध झाला होता. मन सुन्न करणाऱ्या या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Web Title: Unfortunate incident in Nagnath temple area; A 12-year-old boy died after an iron gate fell on him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.