जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:28 AM2021-05-01T04:28:35+5:302021-05-01T04:28:35+5:30

मागील चार ते पाच दिवसांपासून वातावरणात बदल जाणवत आहे. दोन दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह जोराचा वारा वाहात आहे. काही ठिकाणी ...

Untimely rains with thunderstorms in the district | जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस

Next

मागील चार ते पाच दिवसांपासून वातावरणात बदल जाणवत आहे. दोन दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह जोराचा वारा वाहात आहे. काही ठिकाणी पावसाचा शिडकावाही झाला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी गुरुवारी दुपारपर्यंत वातावरण स्वच्छ होते. मात्र, दुपारनंतर वातावरणात बदल जाणवत होता. काही वेळात ढगाळ वातावरण झाले. यासोबत जोराचा वारा वाहात होता. तसेच विजाही चमकत होत्या. जिल्ह्यातील डिग्रस, कऱ्हाळे, सेनगाव, कनेरगाव नाका, फाळेगाव, आखाडा बाळापूर, घोळवा, जवळा पांचाळ आदी परिसरात विजांच्या कडकडाटासह जोराचा वारा वाहात होता. यातील काही ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने वातावरणात गारवा जाणवत होता. दरम्यान, हवामान विभागाने ३० एप्रिल ते २ मे या कालावधीत हिंगोली जिल्ह्यासह मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविली आहे.

नागरिकांनी खबरदारी घेण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

यावेळी विजांचा कडकडाट हाेण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

आकाशात विजा चमकत असल्यास तत्काळ सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. पोहणारे, मच्छीमारी करणाऱ्यांनी पाण्यातून बाहेर यावे, जवळ आसरा नसेल तर पायाखाली लाकूड, प्लास्टिक, गोणपाट अशा वस्तू अथवा कोरडा पालापाचोळा ठेवावा. तसेच दोन्ही पाय एकत्र करून गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून डोके जमिनीकडे, गुडघ्यामध्ये झुकवा. मात्र, डोके जमिनीवर टेकणार नाही, याची काळजी घ्या, झाडाच्या उंचीपेक्षा दुप्पट अंतरावर उभे राहावे, विजेचे खांब, टेलिफोन खांब, लोखंडी पाईप आदी वीजवाहक वस्तूंपासून दूर राहावे, वीज पडल्यास प्राथमिक उपचार म्हणून हृदयाच्या बाजूने मालिश करावे. तोंडाने श्वसन प्रक्रियेस मदत करावी, संगणक, विद्युत उपकरणे बंद करून ठेवावीत, असे आवाहनही केले आहे. तसेच

आकाशात विजा चमकत असल्यास पाण्याचे नळ, फ्रीज, टेलिफोन यांना स्पर्श करू नका. बाहेर असाल तर भ्रमणध्वनी तत्काळ बंद करावा, विजेच्या खांबाजवळ उभे राहू नका, झाडाखाली आश्रय घेऊ नका, दोन चाकी, सायकलवर असाल तर तत्काळ उतरून सुरक्षित ठिकाणी जा, धातूची कांडी असलेल्या छत्रीचा वापर करू नका, असेही आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

Web Title: Untimely rains with thunderstorms in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.