हिंगोली जिल्ह्यात २७ नोव्हेंबरपासून लसीकरण मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 11:09 PM2018-10-12T23:09:29+5:302018-10-12T23:09:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क हिंगोली : गोवर व रुबेला आजाराच्या नियंत्रणासाठी जिल्ह्यात २७ नोव्हेंबरपासून लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी ...

Vaccination campaign from Hingoli district on November 27 | हिंगोली जिल्ह्यात २७ नोव्हेंबरपासून लसीकरण मोहीम

हिंगोली जिल्ह्यात २७ नोव्हेंबरपासून लसीकरण मोहीम

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : गोवर व रुबेला आजाराच्या नियंत्रणासाठी जिल्ह्यात २७ नोव्हेंबरपासून लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी सांगितले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील डीपीसी सभागृहात जिल्ह्यातील इंग्रजी शाळांच्या मुख्याध्यापकांसाठी आयोजित गोवर-रुबेला कार्यशाळेत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, दिलीप बांगर, कल्याणकर, डॉ. मंगेश टेहरे, डॉ. गोपाल कदम यांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी भंडारी म्हणाले, भारत सरकारने २०२० पर्यंत गोवर या आजाराचे निर्मूलन व रुबेला या आजाराचे नियंत्रण करण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये महाराष्ट्र राज्यात गोवर रुबेला लसीकरण मोहीम हाती घेण्याचे ठरविले आहे. ही मोहीम किमान पाच आठवड्यांच्या कालावधीसाठी राबविण्यात येत असून पहिल्या सत्रात सर्व शाळांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्याचे नियोजन आहे. त्यानंतर शाळेत न जाणारी मुले तसेच ९ महिने ते ३ वर्षापर्यंतची बालके यांच्यासाठी ही मोहीम प्रभावीपणे राबविली जाईल. ही मोहीम ९ महिने ते १५ वर्षांआतील मुलांमध्ये यशस्वीपणे पार पाडण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत मोठ्या प्रमाणावर जनजागृतीचे सर्व शाळांनी नियोजन करावे असे सूचित केले. सर्वांच्या सहकार्यातून जिल्ह्यात ही मोहिम शंभर टक्के यशस्वीरित्या राबवू, असा विश्वास जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी व्यक्त केला.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक मोरे, डॉ. स्नेहल नगरे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी प्रशांत तुपकरी, ईशी, डी. आर. पारटकर, मुनाफ आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील इंग्रजी शाळांच्या मुख्याध्यापक तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी गोवर-रुबेला कार्यशाळेस हजर होते. सदर मोहीम यशस्वीतेसाठी यावेळी प्रशासकीय यंत्रणेकडून नियोजन करण्यात आले.
नोव्हेंबर महिन्यात संपूर्ण राज्यभरात गोवर रुबेला लसीकरण मोहिम राबविण्यात येणार असून, या मोहिमे दरम्यान सर्व शाळांमध्ये दहावीपर्यंतच्या मुलांना हे लसीकरण करण्यात येणार आहे. याकरीता आरोग्य, शिक्षण व समाजविकास या नगरपालिकेच्या विभागांसह विविध स्वयंसेवी संस्था यांच्या सहयोगातून ही मोहिम प्रभावीरित्या राबविण्यासाठी आरोग्य विभागामार्फत नियोजन करण्यात आले आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये महाराष्ट्र राज्यात गोवर रुबेला लसीकरण मोहिम हाती घेण्याचे ठरविले आहे. ही मोहिम किमान पाच आठवड्यांच्या कालावधीसाठी राबविण्यात येणार आहे.

Web Title: Vaccination campaign from Hingoli district on November 27

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.