लसीकरण प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:26 AM2021-01-17T04:26:21+5:302021-01-17T04:26:21+5:30
- डाॅ. दीपक मोरे, वैद्यकीय अधिकारी महिलांमधून प्रातिनिधिक स्वरुपात लस घेतल्याचा मनस्वी आनंद झाला. ही लस घेतल्यानंतर कोणताही त्रास ...
- डाॅ. दीपक मोरे,
वैद्यकीय अधिकारी
महिलांमधून प्रातिनिधिक स्वरुपात लस घेतल्याचा मनस्वी आनंद झाला. ही लस घेतल्यानंतर कोणताही त्रास झाला नाही. येथे निरीक्षण कक्षही ठेवला आहे. आरोग्य यंत्रणेतील सर्व सहकाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे. त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून पहिली लस घेतली. इतरांनीही घ्यावी.
- रमा गिरी
प्राचार्या, नर्सिंग काॅलेज
लसीकरणाच्या या मोहिमेत खासगी डाॅक्टरांनाही लस दिली जाणार आहे. माझ्या सर्व सहकारी मित्रांनी कोणतीही भीती न बाळगता ही लस घ्यावी, यासाठी आज पहिली लस मी घेतली. या लसीमुळे कोरोनापासून संरक्षणास मदत होणार आहे. इतरांनीही लस घेऊन उपक्रम यशस्वी करावा.
- डाॅ. स्नेहल नगरे,
खासगी वैद्यकीय व्यावसायिक
कळमनुरीतील केंद्रावर मला पहिली लस देण्यात आली. एक महिन्याने आणखी एक लस घेतल्यानंतर कोरोनापासून बचावाची शक्ती येणार आहे. आरोग्य विभागील सर्व सहकाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे. सर्वांनी ही लस घ्यावी. ही लस घेतल्याने कोणताही त्रास होत नाही. त्यामुळे सर्वांनी फायदा घ्यावा.
- डाॅ. आनंद मेने,
वैद्यकीय अधिकारी
जिल्ह्यासाठी ६५०० लसींचे आले डोस
हिंगोली जिल्ह्यासाठी ६५०० लसींचे डोस प्राप्त झाले आहेत. यामध्ये ३२५० जणांना लसीकरणाचा लाभ देता येणार आहे. प्रत्येक लाभार्थीला दोन लस द्याव्या लागणार आहेत. पहिली लस दिल्यानंतर महिन्यानंतर दुसरी लस दिली जाणार आहे. त्यामुळे पहिली लस दिली त्यांची दुसरी लस आताच सुरक्षित करून ठेवण्यात आली आहे.
लसीकरणानंतर कोणाला रिॲक्शन झाले का?
हिंगोलीत लसीकरणाच्या ठिकाणी लस दिल्यानंतर काहीवेळ तेथेच आराम करायची व्यवस्था केली. त्यानंतर तेथून संबंधितास निरीक्षण कक्षात पाठविण्यात येते. तेथेही वैद्यकीय अधिकारी व परिचारिका ठेवण्यात आल्या आहेत.
या निरीक्षण कक्षात ठरावीक वेळ घालविताना लस घेतलेल्यास काही त्रास होतो का, याची विचारणा केली जात होती. हिंगोली व कळमनुरी या दोन्हीही ठिकाणी लस घेतल्यानंतर कुणालाच त्रास झाला नाही.