शिरडशहापूर आरोग्य केंद्रांतर्गत तीन गावात लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:19 AM2021-07-09T04:19:58+5:302021-07-09T04:19:58+5:30
मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांच्या आदेशान्वये लसीकरण कॅम्पचे आयोजन करण्यात ...
मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांच्या आदेशान्वये लसीकरण कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक आरोग्य केंद्र, शिरडशहापूर, उपकेंद्र मार्डीअंतर्गत उमरा, काठोडातांडा, चोंढीशाहापूर येथे लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. उमरा येथे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अंकिता अक्यमवार, आरोग्य सहाय्यक अरूणाताई जोगदंड, आरोग्यसेविका पी. आर. धात्रक, आरोग्य कर्मचारी एस. के. सूर्यवंशी, आशा स्वयंसेविका जयभीम ठेंबरे, काठोडा तांडा येथे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. अर्जुन गीते, आरोग्य सेविका ध्रुपता क्षीरसागर, आरोग्य कर्मचारी पांडुरंग देवकते, आशा स्वयंसेविका अनिता राठोड, संघमित्रा मुंढे, अंगणवाडीसेविका कविताबाई राठोड, मदतनीस यमुना राठोड, तर चोंढी शहापूर येथे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. मंगेश महाजन, आरोग्य आरोग्य सहाय्यक के. यु. सय्यद, आरोग्यसेविका संजीवनी देवकते, शिवनंदा आडे, आरोग्य कर्मचारी गोपाल हाके, ग्रामसेवक केशव काळे, मुख्याध्यापक तोरकड, संदेश अडकिणे, प्रभाकर कऱ्हाळे, किशन राठोड, पुष्पाताई कुटे, सरपंच भारत कठाळे, उपसरपंच भाऊराव काळे, विनोदी राठोड, भाऊराव जुंबडे यांनी लसीकरण करून घेण्यासाठी प्रयत्न केेले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन गिराम, वैद्यकीय अधिकारी डॉ. धामणे आदींची उपस्थिती होती.