जिल्ह्यातील सर्व शासकीय दवाखान्यासह खासगी पाच रुग्णालयांत होणार लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:34 AM2021-03-01T04:34:00+5:302021-03-01T04:34:00+5:30
हिंगोली : कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसह ४५ ते ५९ वयोगटांतील इतर आजार असणाऱ्या नागरिकांचे १ ...
हिंगोली : कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसह ४५ ते ५९ वयोगटांतील इतर आजार असणाऱ्या नागरिकांचे १ मार्चपासून लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा १ मार्चपासून सुरू होणार आहे. त्याआनुषंगाने जिल्हा आरोग्य प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. लसीकरणासाठी शासकीय व काही खासगी रुग्णालयांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये शासकीय रुग्णालयात मोफत, तर खासगी रुग्णालयात २५० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. परंतु, यासाठी लाभार्थ्यांना अगोदर नोंदणी करावी लागणार आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे लसीकरण केंद्रात घेऊन जावे लागणार आहेत.
अशी करावी लागणार नोंदणी
इच्छुक लाभार्थ्यांना कोविन २.० तसेच आरोग्य सेतू या ॲपवर अगोदर नोंदणी करावी लागणार आहे. यासाठी लाभार्थ्यांना सोबत आधारकार्ड किंवा मतदान ओळखपत्र सोबत असणे बंधनकारक आहे. नोंदणी झालेल्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.
कोणाला मिळणार लस
जिल्ह्यातील ६० वर्ष वयोगटांतील ज्येष्ठ नागरिक तसेच विविध आजार असलेले ४५ ते ५९ वयोगटातील लाभार्थींना लस देण्यात येणार आहे. आजार असणाऱ्या नागरिकांना डॉक्टरांचे प्रमाणपत्र साेबत असावे लागणार आहे.
येथे मिळणार कोरोना लस
सरकारी रुग्णालये.
जिल्हा रुग्णालय.
सर्व उपजिल्हा रुग्णालय.
सर्व प्रा. आ. केंद्र.
सर्व आरोग्य उपकेंद्र.
नागरी आरोग्य केंद्रासह इतर शासकीय रुग्णालये.
खाजगी रुग्णालये.
जगदंब क्रिटिकल केअर मल्टी स्पेशालिटी, हिंगोली.
नाकाडे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, हिंगोली
आयकॉन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, हिंगोली.
माधव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, हिंगोली.
स्नेहल नर्सिंग हॉस्पिटल, हिंगोली.