जिल्ह्यातील १ लाख ३१ हजार बालकांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2018 12:42 AM2018-12-10T00:42:28+5:302018-12-10T00:43:00+5:30

येथील आरोग्य विभागाची जिल्हा परिषद षटकोनी सभागृहात ९ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यकांची गोवर रुबेला लसीकरण मोहिमेअंतर्गत बैठक घेण्यात आली.

 Vaccine of 1 lakh 31 thousand children in the district | जिल्ह्यातील १ लाख ३१ हजार बालकांना लस

जिल्ह्यातील १ लाख ३१ हजार बालकांना लस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील आरोग्य विभागाची जिल्हा परिषद षटकोनी सभागृहात ९ डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यकांची गोवर रुबेला लसीकरण मोहिमेअंतर्गत बैठक घेण्यात आली.
यावेळी बैठकीत जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच नवीन नियोजना संदर्भात संबधित यंत्रणेला सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. लसीकरण मोहीम राबविताना अधिकारी कर्मचाऱ्यांना येणाºया अडी-अडचणी यावेळी समजून घेण्यात आल्या. तसेच उपाय-योजना करून लसीकरण माहीमेचे उदिष्ट पुर्तते संदर्भात संबधित यंत्रणेतील जबाबदार अधिकारी व कर्मचाºयांन कडक सूचनाही यावेळी दिल्या. गोवर रुबेला लसीकरण मोहीमेत ९० टक्केच्या वर काम केलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांचे डॉ. शिवाजी पवार यांच्याहस्ते सत्कार केला. यावेळी जागतिक आरोग्य संघटनेचे प्रतिनिधी डॉ. पुरुषोत्तम कुमार जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सतिश रुणवाल, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, डॉ. सुनील देशमुख डॉ. अविनाश गायकवाड, डॉ. नामदेव कोरडे, कमलेश ईशी, सुनील मुन्नेश्वर, नरवाडे, शुभांगी खिल्लारे, सुनील जगताप, श्याम जामकर, पारटकर व जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी प्रशांत तुपकरी आदी उपस्थित होते.
लसीकरण पुर्वी मुलांना जेवायला द्यावे. तसेच मुलांना लसीकरणाची भिती वाटत असेल तर त्यांना भिती न बाळगण्याबाबतचा आत्मविश्वास द्यावा, तीव्र ताप आल्यास किंवा गंभीर आजारी असल्यास लस देऊ नये. गोवर रुबेला लसीकरणमुळे जर लालसर पुरळ किंवा खाज येणे अशी लक्षणे दिसल्यास घाबरु जाऊ नये. असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
३ लाख १८ हजार २३० बालकांना गोवर रूबेला लस देण्याचे उदिष्ट असून त्यापैकी आतापर्यंत १ लाख ३१ हजार २६० बालकांना गोवर रूबेला लस देण्यात आली. उर्वरीत मुला-मुलीना १० जानेवारी २०१९ पर्यंत देण्याचे उदिष्ट ओहे. ९ महिने ते १५ वयोगटातील मुला मुलींना गोवर-रूबेला लस न घाबरता देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जि. प. अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, जि. प. उपाध्यक्ष अनिल पंतगे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. शिवाजी पवार आदींनी केले.

Web Title:  Vaccine of 1 lakh 31 thousand children in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.