शाळांत मूल्यवर्धन कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 01:13 AM2018-06-24T01:13:11+5:302018-06-24T01:13:30+5:30
विद्यार्थी देशाचे सुज्ञ नागरिक बनावेत, राज्य घटनेतील मूल्ये त्यांच्यात रुजावित, विद्यार्थी लोकशाहीचे जबाबदार संवेदनशिल व कर्तबगार नागरिक बनावेत त्या संबंधीत कौशल्य विकसित करण्यासाठी त्यांना नियोजित अशा संधी सातत्याने देणे यासाठी येत्या जुलै महिन्यापासून तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मूल्यवर्धनाचा कार्यक्रम राबविला जाणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी राजेश पातळे यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : विद्यार्थी देशाचे सुज्ञ नागरिक बनावेत, राज्य घटनेतील मूल्ये त्यांच्यात रुजावित, विद्यार्थी लोकशाहीचे जबाबदार संवेदनशिल व कर्तबगार नागरिक बनावेत त्या संबंधीत कौशल्य विकसित करण्यासाठी त्यांना नियोजित अशा संधी सातत्याने देणे यासाठी येत्या जुलै महिन्यापासून तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मूल्यवर्धनाचा कार्यक्रम राबविला जाणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी राजेश पातळे यांनी दिली.
२०१८-१९ या वर्षात हिंगोली जिल्ह्यातून फक्त कळमनुरी तालुक्याची निवड केली आहे. पहिली ते चौथीसाठीच हा मूल्यवर्धनाचा कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम महाराष्टÑ शासन व शांतीलाल मुथा फाऊंडेशन पुणे यांच्या वतीने राबविण्यात येणार आहे. यात प्रत्येक केंद्रातील केंद्रप्रमुख व दोन उपक्रमशील शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे शिक्षक नंतर पहिली ते चौथीपर्यंत शिकविणाऱ्या सर्व शिक्षकांना प्रशिक्षण देणार आहेत. मूल्यवर्धनाचा अभ्यासक्रम हा पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रमापेक्षा वेगळा राहणार आहे. दोन महिने शिक्षक विद्यार्थ्यांना मूल्यवर्धनाचा अभ्यासक्रम शिकविणार आहेत. ज्ञानरचनावाद, बालस्रेही आनंददायी विद्यार्थी केंद्रित शिक्षण पद्धतीचा वापर, राष्टÑीय अभ्यासक्रम आराखडा २००५, शिक्षण हक्क कायदा २००९, प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम २०१२ यावर आधारित अभ्यासक्रम राहणार आहे. नियोजित उपक्रमातून त्यांना आनंददायी बनविले जाणार आहे. मूल्य शिक्षणाची बिजे रुजविणे, विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, पालक या सर्व हितसंबधितांशी संवाद साधणारा समग्र शाळा, दृष्टिकोन अंगिकारून मूल्य रुजविणारा हा कार्यक्रम राहणार आहे.
लवचिक कार्यक्रम
शाळांच्या गरजा, प्राधान्यक्रम उपलब्ध असणारी साधनसामग्री यानुसार आवश्यक वाटतील, असे बदल करून राबविण्यात येणारा लवचिक हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामुळे अध्यापन विषयीच्या विद्यार्थ्यांच्या अपेक्षा पुर्ण होणार आहे. लवकरच केंद्रप्रमुख व मुख्याध्यापकांची बैठक घेवून त्यांना या कार्यक्रमाबाबत माहिती दिली जाणार असल्याचे पातळे यांनी सांगितले.