हिंगोली जिल्हा कचेरीसमोर विविध उपोषणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 12:17 AM2018-01-26T00:17:34+5:302018-01-26T00:17:40+5:30
येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी उपोषणे बसली आहेत. यामध्ये सर्वाधिक उपोषणे घरकुलांच्या मागणीसाठीचीच आहेत. विशेष म्हणजे गत दोन ते तीन वर्षापासून अनेकांच्या मागण्या रेंगाळलेल्या आहेत. तरीही न्याय मिळेल या आशेने प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमिवर या ठिकाणी अनेक उपोषणार्थींनी उपोषण सुरु केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यासाठी उपोषणे बसली आहेत. यामध्ये सर्वाधिक उपोषणे घरकुलांच्या मागणीसाठीचीच आहेत. विशेष म्हणजे गत दोन ते तीन वर्षापासून अनेकांच्या मागण्या रेंगाळलेल्या आहेत. तरीही न्याय मिळेल या आशेने प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमिवर या ठिकाणी अनेक उपोषणार्थींनी उपोषण सुरु केले आहे.
घरकुलाची मागणी
४हिंगोली - औंढा नागनाथ तालुक्यातील असोला तर्फे नांदापूर येथील भिकाजी नागरे, सखाराम नागरे, भीमा नागरे, कविताबाई नागरे आदींनी घरकुलाच्या मागणीसाठी उपोषण सुरु केले आहे. असोला येथे गरिबांना घरकुलाचा लाभ न देता धनदाडग्यांना लाभ दिल्याचे निवेदनात म्हटले आहे. यासाठी लाभार्थ्यांनी उपोषण सुरु केले आहे.
रस्त्यावर अतिक्रमण
४हिंगोली - वसमत येथील शेख चांदपाशा बाबामियाँ यांनी रजिष्टÑीद्वारे खरेदी केलेल्या प्लॉटचा जोड रस्ता ले आऊट ९ मीटरच्या अंतर्गत आहे. परंतु त्यावर दोघांनी केले. ते अतिक्रमण काढण्यासाठी पालिकेलाही निवेदनाद्वारे वारंवार कळवून उपयोग झालेला नाही. त्यामुळे लेकराबाळांसह उपोषण सुरु केले आहे.
भूखंड बळकावला
४हिंगोली - शहरातील सिद्धार्थ सहकारी मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेत काही संबंध नसलेल्या दोघांनी माझ्या मालकीचा भूखंड बळकावल्याची तक्रार आहे. भूखंड देण्याच्या मागणीसाठी रामराव खांदळे, संगीता खांदळे यांनी उपोषण सुरु केले आहे.
आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
४हिंगोली - सेनगाव तालुक्यातील सुलदली खुर्द येथील काशीराम आश्रु गोरे व इतर दोघांनी मिळून सुकळी पाणंदीमध्ये वटकळी शिवारात आडवून काशिराम विठोबा वारभड यांना जिवे मारण्याच्या उद्देशाने किटकनाशक पाजले. वारभड यांना सामान्य रुग्णालयात भरती केल्यानंतर तोंडी जवाब दिला. शिवाय १७ जानेवारी रोजी सेनगाव पोलिसांत अर्ज देऊनही कार्यवाही केली नसल्याने काशीराम वारभड यांनी उपोषण सुरु केले आहे.
‘नमुना नं ८ द्या’
४हिंगोली- वसमत तालुक्यातील सुकळी येथील ग्रामसेवक घर क्रमांक २८४ च्या जागेचा नमुना नं ८ देण्यास टाळाटाळ करीत आहे. त्यामुळे गंगाधर इंगोले यांनी सपत्निक उपोेषण सुरु केले आहे. तसेच जागेची चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिलेले असले तरीही आदेशाकडे दुर्लक्ष केले जात आहे.
उडीद-मुगाच्या चुकाºयाची मागणी
४हिंगोली - तालुक्यातील आडगाव येथील शेतकºयांनी खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून विक्री केलेल्या उडीद व मूगाचे अद्याप चुकारे मिळालेले नाहीत. त्यामुळे चुकारे मिळण्याच्या मागणीसाठी शेतकºयांनी उपोषण सुरु केले आहे. विशेष म्हणजे हे उपोषणकर्ते विद्यमान आ. तान्हाजी मुटकुळे यांच्या गावाचे असल्याने तेथील शेतकºयांची ही दशा तर इतर शेतकºयांचे काय? याची परिसरात एकच चर्चा होत आहे. तर या उपोषणास अॅड. विजय राऊत यांनी पाठिंबा दिला आहे.
घरकुलासाठी डावलले
४हिंगोली - सेनगाव तालुक्यातील शेगाव खोडके येथील गरजुवंत लाभार्थ्यांना घरकुलाच्या लाभापासून डावलले आहे. तसेच ग्रामसेवकही उद्धट उत्तरे देत आहे. शिवाय धनदांडग्यांना घरे देण्याचा सपाटा लावला आहे. तसेच दारिद्र्य रेषेच्या यादीतदेखील नावे समाविष्ट केली नाहीत. तर अनेकांनी दुसºया माळ्यावर घरकुल योजनेचा लाभ घेऊन घर उभारल्याचे उपोषणकर्ते सांगत होते. त्याच्या चौकशीसाठी २७ लाभार्थ्यांनी उपोषण सुरु केले आहे.
समाजमंदिर देण्याची मागणी
४हिंगोली - वसमत तालुक्यातील बोरी सावंत येथील मारोती मुंजाजी गायकवाड व शिरंग लोभाजी खंदारे यांच्या नावावरील प्लॉटींग उपोषणकर्त्यांच्या नावावर करुन येथे समाज मंदिर उभारण्याच्या मागणीसाठी ४२ उपोषणकर्त्यांनी उपोषण सुरु केले आहे.
दरम्यान, २६ जानेवारीला पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले जाईल, असा समज करून अनेक जण पूर्वसंध्येलाच उपोषणास बसतात. तर २६ रोजी आणखी काही जणांची यात वाढ होण्याची शक्यता आहे. यातील काहींना प्रशासनाकडून आश्वासन देण्याचा प्रयत्न झाला. मात्र ते मागणीवर ठाम असल्याचे दिसत आहे.
जि. प. समोर : उपोषणकर्त्यांची गर्दीच
जिल्हा परिषद कार्यालयासमोर व कृषी अधिक्षक कार्यालयासमोरही उपोषण सुरु केले आहेत. जि.प.समोर वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील एस. पी. खंदारे हे हयातनगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातून सेवानिवृत्त झाले आहेत. परंतु त्यांना अद्याप पेन्शन मंजूर झालेले नसल्याने शिवराम खंदारे यांनी उपोषण
सुरु केले आहे. तर सेनगाव तालुक्यातील साखरा येथील प्रमोद वाकळे यांना ग्रा.पं. कर्मचारी म्हणून नियुक्ती करण्यासह तीन वर्षांचे वेतन देण्याच्या मागणीसाठी भीमसंग्राम सामाजिक संघटनेतर्फे उपोषण सुरु केले आहे.
जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय माहिती अधिकारात माहिती देत नसल्याने भारिप बहुजन महासंघाचे शहराध्यक्ष शेख अतीखूर यांनी जिल्हा कृषि अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरु केले.