जागतिक एडस् दिनानिमित्त विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 12:57 AM2018-12-02T00:57:46+5:302018-12-02T00:58:07+5:30
महाराष्टÑ राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई व जिल्हा एड्स प्रतिबंध, नियंत्रण कक्ष, सामान्य रुग्णाल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिनानिमित्त १ डिसेंबर रोजी शहरातून प्रभातफेरी व शपथग्रहण आणि पथनाट्य यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : महाराष्टÑ राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई व जिल्हा एड्स प्रतिबंध, नियंत्रण कक्ष, सामान्य रुग्णाल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक एड्स दिनानिमित्त १ डिसेंबर रोजी शहरातून प्रभातफेरी व शपथग्रहण आणि पथनाट्य यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एच.पी.तुम्मोड, अ. जिल्हाधिकारी जगदीश मिनीयार यांनी रॅलीस हिरवा झेंडा दाखवला. यावेळी शपथही देण्यात आली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक किशोर श्रीवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, डॉ. विठ्ठल रोडगे, डॉ. गोपाल कदम, डॉ.किशन लखमावार, डॉ. पोहरे, डॉ. निलावार, डॉ. शिवाजी गिते, डॉ. प्रकाश कोठूळे, उद्धव कदम, ज्ञानेश्वर चौधरी, रमा गिरी आदी उपस्थित होते.
शहरातील पोस्ट आॅफीस ते जवाहर रोड मार्गे गांधी चौक अशी प्रभातफेरी काढण्यात आली. जागतिक एड्स दिन व पंधरवड्याच्या निमित्ताने डापकु विभागामार्फत जिल्ह्यात महाविद्यालयात जनजागृती व विविध स्पर्धा पथनाट्यांचे आयोजन करण्यात आले होते. आदर्श महाविद्यालयात घेण्यात आलेल्या पोस्टर स्पर्धेत गोपाळ बोचरे यांनी प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय सुरेखा जमधाड, तृतीय श्वेता मोघले आदींना प्रशस्तीपत्र देण्यात आले. प्रभातफेरीदरम्यान प्रतीक फाऊंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना बिस्कीट व पाणी पाऊच केले.
वसमत येथील डॉ. प्रशांत सोमाणी यांनी एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या १८ वर्षांखालील बालकांना आरोग्य संवर्धनासाठी आवश्यक असलेली सेप्ट्रॉन सिरप देऊन सामाजिक बांधलकी जपण्याचा जपण्याचा संदेश दिला. यशस्वीतेसाठी संजय पवार, आशिष पाटील, टीना कुंदनानी, बालाजी चाफाकानडे, साबळे, वाठोरे, बलखंडे, सतीश खंदारे, सदाशिव आघाव, रामेश्वर चौधरी, सुनीता गायकवाड, डोलारे, डुकरे, चोपडे, उबाळे, जगताप, मुदिराज आादींनी परिश्रम घेतले.
केंद्र व राज्य सरकार, सामाजिक संस्था व संघटनांच्या माध्यमातून होणारी जनजागृृती व जिल्हा रूग्णालयातील ए.आर.टी सेंटरमार्फत एचआयव्हीग्रस्त रूग्णांवर योग्य औषधोपचार, समुपदेशनामुळे हिंगोली जिल्ह्यातील एडस्च्या रूग्णसंख्येत घट होत आहे. सध्या जिल्हा रूग्णालय येथील ए.आर.टी सेंटरमधील ३ हजार १०१ रूग्णांवर उपचार व समुपदेशन केले जात आहे. एचआयव्ही बाधित रूग्णांनी नियमित उपचार घेतल्यास रोग प्रतिकार शक्ती वाढते व इतर आजारही बळावत नाहीत. असे एआरटी सेंटरचे डॉ. प्रकाश कोठुळे यांनी सांगितले.मार्गदर्शन व उपचाराने एचआयव्ही बाधीत रूग्णही सर्वसामान्यासारखे जीवन जगू शकतात, असेही सांगितले.