औंढा नागनाथ विश्वस्थांच्या बैठकीत विविध ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:20 AM2018-01-23T00:20:19+5:302018-01-23T00:20:25+5:30
फेब्रुवारी महिन्यात पार पडणा-या महाशिवरात्र महोत्सावानिमित्त श्री नागनाथ संस्थान व नागरिकांची रविवारी बैठक घेतली. यात यात्रेच्या अनुषंगाने विविध समित्यांची स्थापना केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औंढा नागनाथ : फेब्रुवारी महिन्यात पार पडणा-या महाशिवरात्र महोत्सावानिमित्त श्री नागनाथ संस्थान व नागरिकांची रविवारी बैठक घेतली. यात यात्रेच्या अनुषंगाने विविध समित्यांची स्थापना केली.
ज्योतिर्लिंग असलेल्या श्री नागेश्वर मंदिरात महाशिवरात्र महोत्सव ११ ते १८ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे. त्या अनुषंगाने संस्थानचे विश्वस्थ व सल्लागार मंडळाच्या बैठकीत उत्सवाच्या अनुषंगाने मंदिराची रंगरंगोटी, विद्युत रोषणाई, भाविकांच्या प्राथमिक गरजांवर आधारित उपाययोजना करण्याचा निर्णय मंडळातर्फे घेतला आहे. तसेच आत्महत्याग्रस्त कुटुंबांना, गरीब कुटूंबांनाही आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेत गरीब कुटुंबातील मुलींचे सामूहिक विवाह सोहळ्याचेही आयोजन करण्याचा निर्णय आ.डॉ. संतोष टारफे यांच्या अध्यक्षतेखाली घेतला. यंदा नागरिकांच्या सूचनेनुसार व त्यांच्याच सहकार्यातून महोत्सव पार पाडण्याची भूमिका मंदिर प्रशासनाने घेतल्याने नागरिकांनी याचे स्वागत केले. तर काही सुचविलेल्या सूचनाही संस्थानच्या वतीने मान्य केल्या. यावेळी उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बानापुरे, संस्थान अध्यक्ष तथा तहसीलदार पांडुरंग माचेवाड, नगराध्यक्षा दीपाली शरद पाटील, उपाध्यक्षा अलका गणेश कुरवाडे, पोनि कुंदनकुमार वाघमारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन वाशिमकर, विश्वस्थ डॉ. किशन लखमावार, डॉ.पुरूषोत्तम देव, अॅड. मुंजाभाऊ मगर, गजानन वाखरकर, विद्याताई पवार, गणेश देशमुख, डॉ. देविदास कदम, आनंद निलावार, डॉ. देविदास खरात, महेश बियाणी, रमेश बगडिया, अॅड. राजेंद्र अग्रवाल, पंजाब गव्हाण, शरद पाटील, शिवाजी देशपांडे, श्रीपाद दीक्षित, अनिल देव, विजय महामुने, रामराव पाटील, मोतीराम राठोड, सुरेश गिरी, नागनाथ रेणके, नंदकुमार पाटील, वैजनाथ पवार, व्यवस्थापक शंकर काळे, बापूराव देशमुख यांची उपस्थिती होती.
समित्या स्थापन : बंदोबस्तही ठेवणार
सात दिवस चालणाºया यात्रा महोत्सव काळात भाविकांची गर्दी मोठी असल्याने या काळात गावकºयांच्या मदतीने हा उत्सव पार पाडण्यासाठी आरोग्य समिती, आर्थिक व्यवहार, देखरेख समिती, भोजन समिती, धार्मिक कार्यक्रम समिती, दर्शन व्यवस्था अशा विविध समित्या स्थापन करून यावर नागरिकांच्या नियुक्त्या
केल्या आहेत. तसेच हा उत्सवात ग्रामस्थांनी आपल्या गावाचा उत्सव आहे, असे समजून शांततेत पार पाडण्याचे आवाहन आ.डॉ. संतोष टारफे यांनी केले. अनुचित प्रकार टाळण्यासाठी महोत्सवा दरम्यान येथे चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात येणार आहे.