वर्षा गायकवाड तीन दिवसांच्या जिल्हा दौऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:33 AM2021-08-13T04:33:44+5:302021-08-13T04:33:44+5:30
१३ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजता शासकीय विश्रामगृहावर त्यांचे आगमन होणार आहे. त्यानंतर १० वाजता हिंगोली येथील ऑनलाईन निसर्ग ...
१३ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजता शासकीय विश्रामगृहावर त्यांचे आगमन होणार आहे. त्यानंतर १० वाजता हिंगोली येथील ऑनलाईन निसर्ग शाळेचे उद्घाटन. ११.३० वाजता एमजेपीजेएवाय व पीएजेएवाय योजनेचे उद्घाटन. दुपारी १२.०५ वाजता हिंगोली नगर परिषदेंतर्गत बांधकाम करण्यात आलेल्या इमारतीचे लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती . २ वाजता महाविकास आघाडी कार्यकर्त्यांच्या भेटी. २.३० ते ३.०० वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह येथे राखीव. ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड-१९, पीक विमा व पीक कर्ज, कायदा व सुव्यवस्था आढावा बैठकीस उपस्थिती. ४.३० वाजता खा. राजीव सातव जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्राच्या भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थित राहणार आहे. सायं. ५ वाजता शासकीय विश्रामगृहात आगमन होणार आहे.
१४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता कळमनुरी नगर परिषदेंतर्गत रस्ता, शाळेचे बांधकाम व सुशोभिकरण कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते हाेणार असून त्यानंतर पंचायत समिती कळमनुरी येथे महिलांना गॅस वाटप कार्यक्रमास उपस्थिती राहणार आहेण दुपारी १.३० वाजता माजी मंत्री तथा साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्या निवासस्थानी भेट. २ वाजता वसमत येथे सामाजिक भवन व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सुशोभिकरण भूमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती असणार आहे. सांय. ५.३० वाजता हिंगोली शासकीय विश्रामगृह त्यांचे आगमन होणार आहे. सायंकाळी ६.३० वाजता हिंगोली येथे विधवा महिलांना शिलाई मशीनचे वाटप त्यांचे हस्ते होणार आहे.
१५ रोजी सकाळी ९.०५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती. १० वाजता जिल्हा परिषद येथे महाआवास अभियान पुरस्कार वितरण आणि जिल्हास्तरीय शिक्षक स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रमास उपस्थिती असणार आहे. दुपारी १२.३० वाजता शासकीय विश्रामगृहात आगमन होणार आहे.