वसमत शहराला दोन दिवस निर्जळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:28 AM2018-03-31T00:28:32+5:302018-03-31T00:28:32+5:30

वसमत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला लागलेली गळती थांबवण्यासाठी काम सुरू करण्यात आले आहे. पाईपलाईन दुरूस्तीच्या कामामुळे शहराला दोन दिवस निर्जळीचा सामना करावा लागणार आहे.

 Vasamat city for two days is dehydrated | वसमत शहराला दोन दिवस निर्जळी

वसमत शहराला दोन दिवस निर्जळी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : वसमत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला लागलेली गळती थांबवण्यासाठी काम सुरू करण्यात आले आहे. पाईपलाईन दुरूस्तीच्या कामामुळे शहराला दोन दिवस निर्जळीचा सामना करावा लागणार आहे.
वसमत शहराला सिद्धेश्वर धरणावरून पाईपलाईन द्वारे पाणी मिळेल. ही पाईपलाईन शिरडशहापूर जवळ फुटली. फुटलेली पाईपलाईन दुरूस्तीचे काम नगरपालिकेने शुक्रवारी सुरू केले. किमान दोन दिवस तरी कामात जाणार आहेत. त्यामुळे शहराला दोन दिवस पाणी मिळणार नाही. सिद्धेश्वर ते वसमत पाईपलाईनचा वॉल माथा येथे लिकेज झाला होता. त्याच्याही दुरूस्तीचे काम आज झाल्याची माहिती पाणीपुरवठा विभाग प्रमुख अब्दुल रहेमान चाऊस यांनी दिली. दुरूस्तीच्या कामामुळे दोन दिवस नळाला पाणी मिळू शकणार नाही. त्यानंतर टप्या-टप्प्याने शहराला पाणी दिले जाईल. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे.

Web Title:  Vasamat city for two days is dehydrated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.