आवक वाढल्याने भाज्यांचे भाव उतरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:31 AM2021-01-25T04:31:00+5:302021-01-25T04:31:00+5:30
हिंगाेली शहरातील भाजी मंडईमध्ये लिंबाची आवक गत आठवड्यापेक्षा या आठवड्यात कमीच होती. ३० रुपये किलोने लिंबाची विक्री होताना ...
हिंगाेली शहरातील भाजी मंडईमध्ये लिंबाची आवक गत आठवड्यापेक्षा या आठवड्यात कमीच होती. ३० रुपये किलोने लिंबाची विक्री होताना दिसून आली. मंडईमध्ये टोमॅटो १० रुपये किलो, कोबी १० रुपये किलो, वांगी १० रुपये किलो, ढोबळी मिरची १५ रुपये किलो, कदू १० रुपयास एक, भेंडी २० रुपये किलो, कोथिंबीर ५ रुपयास जुडी, मेथीची जुडी ५ रुपयास, शेवगा शेंगा ६० रुपये किलो, गवार १० रुपये, चवळी शेंगा १० रुपये किलोने विक्री झाल्या.
गत तीन-चार आठवड्यांपासून पालेभाज्यांचे भाव कमी झाल्याने ग्राहकांत आनंदाचे वातावरण पसरले आहे. परंतु, दुसरीकडे पालेभाज्या उत्पादकांना चांगलाच फटका बसत आहे. मंडईत यावेळेस हिरव्या मिरचीची आवक कमीच होती. १० रुपये पावकिलोने विकली जाणारी हिरवी मिरची २५ रुपये पावकिलोने विकली गेली. इतर भाज्यांचे भाव मात्र मोठ्या प्रमाणात कमी झालेले शहरातील मंडईमध्ये पहायला मिळाले.
शेंगदाणा तेलाचे भाव स्थिर
गत आठवड्यात सूर्यफूल १३५ रुपये किलो होते. सूर्यफूल दहा रुपयांनी कमी झाले आहे. सोयाबीन तेल १२५ रुपये होते ते ११५ रुपयाने विक्री होत आहे. साबुदाणा ६०, शेंगदाणा ११५, तूरडाळ ९५, मूगडाळ ९५, मसूर डाळ ९०, हरभरा डाळीचा भाव ६५ रुपये असल्याचे राहुल करेवार यांनी सांगितले.
डाळींब महागले
शहरात पपई व केळीची आवक जास्त असून इतर फळांची आवक मात्र कमी होती. डाळींब २५०, सफरचंद १२०, संत्रा ४०, अंगूर १००, चिकू ६०, मोसंबी ६०, काळे अंगूर १२० रुपये किलोने विक्री झाले. आवक जास्त असल्यामुळे पपई २० रुपये किलो तर केळी २० रुपये डझनने विक्री झाले.
तेलाचे भाव उतरले
सूर्यफूल तेलाचे भाव मागच्या आठवड्यात १३५ रुपये होते. या आठवड्यात सूर्यफुलाचे भाव १० रुपयांनी कमी झाले आहेत. शेंगदाणा तेलाच्या भावात मात्र किराणा बाजारात स्थिरता दिसून आली.
यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जास्त आहे. गावोगावचे ठोक विक्रेते मंडईत पालेभाज्या आणत आहेत. अजून दोन-तीन आठवडे पालेभाज्या स्वस्तच राहतील.
-हरुण बागवान, भाजी विक्रेता, खरबी.
मकर संक्रातीच्या सणापासून पालेभाज्या स्वस्तच मिळत आहेत. भाज्या स्वस्त मिळत असल्या तरी फळांचे दर मात्र गगनाला भिडले आहेत. भाज्यांसोबत फळेही स्वस्त व्हावीत.
-संगीता संगेवार, हिंगोली
या आठवड्यात पपई व केळी वगळता इतर सर्वच फळांची आवक कमी आहे. फळे महाग झाल्याने खरेदी करणेही मुश्कील होऊन बसले आहे. काही दिवसांत फळांची आवक वाढेल.
-अ. जलील बागवान, फळ विक्रेता, हिंगोली