भाजीपाल्यांची आवक वाढल्याने भाज्या स्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:25 AM2021-01-04T04:25:27+5:302021-01-04T04:25:27+5:30
शहरातील मंडईमध्ये रविवारी आवरा शेंगा २५ रुपये किलो, टोमॅटो १० रुपये, कोबी १० रुपये किलो, गाजर १५ रुपये, ...
शहरातील मंडईमध्ये रविवारी आवरा शेंगा २५ रुपये किलो, टोमॅटो १० रुपये, कोबी १० रुपये किलो, गाजर १५ रुपये, टाहाळ १५ रुपये, भेंडी २० रुपये, ढोबळ मिरची २० रुपये, चवळी २० रुपये, हिरवी मिरची १५ रुपये, लिंबू १५ रुपये, मुळा १५ रुपये, दोडके १५ रुपये किलो दराने विकलेे गेले. तसेच कांद्याची पात १० रुपये जुडी, कोथिंबीर ५ रुपये जुडी, मेथी ५ रुपये जुडी या प्रमाणे विक्री होत होती. शहरातील मंडईमध्ये जिल्ह्यातील भांडेगाव, वळद, समगा, माळेगाव, इंचा, केंद्रा, डिग्रस, सेनगाव, पळशी, जवळा, नरसी, पुसेगाव, हिवरखेडा अदी गावांतून भाजीपाला येतो. डिसेंबर २०२० मध्ये शेवटच्या आठवड्यात भाजीपाला महाग झाल्यामुळे ग्राहक असंतुष्ट होते. नवीन वर्षात मात्र भाजीपाला आवक वाढल्याने ग्राहकांना स्वस्त दरात भाजीपाला खरेदी करता येऊ लागला आहे.
रविवारी तेल वगळता इतर किराणा भाव मात्र कमी झाल्याचे पाहायला मिळाले. शहरातील बाजारपेठेत शेंगदाणा १०० रुपये, मूग डळ ९० रुपये, तूर डाळ १०० रुपये, हरभरा डाळ ६० रुपये किलो दराने विक्री झाली, अशी माहिती किराणा दुकानदार दीपक खंडेलवाल यांनी दिली.
नवीन वर्षात फळांचे भाव कमी होतील, असे वाटले होते; परंतु फळांची आवक कमीच होती. त्यामुळे ग्राहकांना फळे वाढलेल्या दरात खरेदी करावे लागत आहेत. सफरचंद १०० रुपये, डाळिंब ११०, चिकू ६० रुपये, अननस ६० रुपये, जांब ३० रुपये किलो तर केव्ही १०० रुपयास ३ नग विकले गेले.
नवीन वर्षात इतर वस्तू स्वस्त झाल्या असला तरी तेलाचे भाव मात्र वाढलेले पाहायला मिळत आहेत. नूतन वर्षात तेलाचे भाव कमी होतील, असे ग्राहकांना वाटले होते; परंतु तेलाचे भाव वाढलेले पाहायला मिळत आहेत.