शहर ठाण्यात वाहनांची जत्रा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 12:16 AM2019-02-08T00:16:21+5:302019-02-08T00:16:41+5:30
मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात पोलीस दलाच्या नियोजनशून्यतेवर माध्यमांतून टिकेचा सूर उमटल्यानंतर त्याचे खापर शहर पोलीस ठाण्यावर फुटले. त्यांनीही ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी अचानक कारवाईला सुरुवात करीत मिळेल ते वाहन पोलीस ठाण्यात आणून लावल्याने ही सूडभावना असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात पोलीस दलाच्या नियोजनशून्यतेवर माध्यमांतून टिकेचा सूर उमटल्यानंतर त्याचे खापर शहर पोलीस ठाण्यावर फुटले. त्यांनीही ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी अचानक कारवाईला सुरुवात करीत मिळेल ते वाहन पोलीस ठाण्यात आणून लावल्याने ही सूडभावना असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत होती.
हिंगोली शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी काही दिवसांपूर्वी खुद्द पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांनी बैठक घेतली होती. सामान्यांना त्रास न होता ही मोहीम राबविण्यास त्यांनी आवर्जून सांगितले होते. मात्र एकाच दिवसात ही मोहीम गुंडाळली अन् शिस्तीपेक्षा बेशिस्तच वाढली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या दौºयाच्या दिवशी बाहेरून आलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाºयांनी नागरिकांना सुकर होईल, अशा पद्धतीने वागण्याऐवजी जणू कर्फ्य लागल्यासारखी वागणूक दिली. तर काहींनी प्रचंड दुर्लक्ष केले. शिवाय सगळ्यात जास्त रोषाचा सामना करावा लागला तो पुढाºयांच्या पासेसवरून. पुतळा परिसरातील पासेसचे नियोजन व्यवस्थित झाले नाही, हे मान्य. मात्र सन्मानही तेवढाच महत्त्वाचा होता. यावरून गदारोळ होणे साहजिकच आहे. मात्र यावरून चिडून शहरात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केल्याने पुन्हाही नागरिकांना वेठीस धरण्याचेच काम केले जात आहे. चुकीच्या बाबींना पोलिसांनी थारा देवूच नये. मात्र इतरांनाही नाहक अडकवून धरल्याने पुन्हा बोंब उठत आहे. वाहतुकीपेक्षा अधीक्षकांनी आधी आपल्याच लोकांना शिस्त लावली तर अधिक सोयीस्कर होणार असल्याच्या प्रतिक्रिया सामान्यांतून उमटत होत्या.