उभ्या ऑटोला टाटा एस वाहनाची धडक ; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 04:35 AM2021-08-18T04:35:26+5:302021-08-18T04:35:26+5:30

औंढा तालुक्यातील वसई येथील भगवान गणपतराव सावळे हे एमएच २२ एच ३४४८ या ऑटोमध्ये बसून गांगलवाडी येथे देवदर्शनासाठी जात ...

Vertical Auto hits Tata S vehicle; One killed | उभ्या ऑटोला टाटा एस वाहनाची धडक ; एक ठार

उभ्या ऑटोला टाटा एस वाहनाची धडक ; एक ठार

Next

औंढा तालुक्यातील वसई येथील भगवान गणपतराव सावळे हे एमएच २२ एच ३४४८ या ऑटोमध्ये बसून गांगलवाडी येथे देवदर्शनासाठी जात होते. यावेळी त्यांनी लघुशंकेसाठी बोरजा पाटीजवळ ऑटो उभा केला. याच वेळी हिंगोलीकडून येणाऱ्या एमएच ३८ ई ३०७९ च्या चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून उभ्या असलेल्या ऑटोस पाठीमागून जोराची धडक दिली. ऑटोत लहान मुले व ऑटोच्या बाजूला उभे असलेल्या भीमराव नारायण लोंढे (रा. मेथा ता. औंढा) यांच्या डोक्यास, उजव्या पायाच्या मांडीस गंभीर दुखापत केली. यात त्यांचा मृत्यू झाला. तसेच इतरांनाही गंभीर दुखापत केली. यात ऑटोचे नुकसाना ही झाले. याप्रकरणी भगवान गणपतराव सावळे (रा. वसई ता. औंढा) यांच्या फिर्यादीवरून टाटा एस वाहन क्रमांक एमएच ३८ ई ३०७९ च्या चालकाविरुद्ध औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास पोह डी. के. दिघाडे करीत आहेत.

Web Title: Vertical Auto hits Tata S vehicle; One killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.