Video: विक्रेत्याने चक्क नालीच्या पाण्याने धुतल्या भुईमूग शेंगा, काय म्हणावे अशा प्रवृत्तीला?
By विजय पाटील | Published: August 19, 2023 04:16 PM2023-08-19T16:16:22+5:302023-08-19T16:17:01+5:30
आता तुम्हीच सांगा? कशा खाव्यात भुईमूग शेंगा
हिंगोली: पाणी व कोरभर भाकर द्या म्हटले तर कोणी नाही म्हणत नाही. पण असे काही माणसे असतात की जे दुष्ट प्रवृत्तीला बाजुला न करता आपला चेहरा जगासमोर आणतात. चक्क नालीचे पाणी घेऊन भुईमुगाच्या शेंगा धुन्याचा प्रकार वसमत शहरात घडला आहे.
वसमत शहर पोलीस ठाण्याच्या बाजुला दररोजच भाजीपाला व फळ विक्रेते आपल्या उदरनिर्वाहासाठी भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. काहीजण नालीच्या बाजूला तर काहीजण नाली नसलेल्या बाजूला भाजीपाला मांडतात. मोठ्या विश्वासाने शहर व परिसरातील नागरिक पोलीस ठाण्यासमोर असलेल्या भाजीपाला विक्रेत्याकडून भाजीपाला विकत घेतात. परंतु ही मंडळी नालीच्या पाण्यातून भुईमुगाच्या शेंगा दूध असतील तर यांच्याकडून इतर भाजीपाला कसा घ्यावा असा प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे. ग्रामीण भागातून आलेला भाजीपाला स्वच्छ व ताजा असतो हा विश्वास आज पर्यंत शहरातील लोकांना होता. पण नालीच्या पाण्याने शेंगा धुतल्यामुळे हा विश्वास कमी झाला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
शनिवारी सकाळी दहाच्या सुमारास दोघांनी पोलीस ठाण्यासमोर भाजीपाल्याचा गाडा लावला. नंतर दोघांपैकी एकाने पोलीस ठाण्यासमोरील नालीतून वाहणारे पाणी पांढरे पातेल्यात घेऊन चक्क भुईमुगाच्या शेंगा धुऊन काढल्या आणि समोर असलेल्या गाड्यावर टाकल्या. हा प्रकार जर ही मंडळी रोज करीत असतील तर भुईमुगाच्या शेंगा खाव्या तरी कशा असा प्रश्न पडणे साहजिकच आहे.
हिंगोली: विक्रेत्याने चक्क नालीच्या पाण्याने धुतल्या भुईमूग शेंगा, आता तुम्हीच सांगा? कशा खाव्यात भुईमूग शेंगा. वसमत शहर पोलीस ठाण्यासमोरचा संतापजनक प्रकार. pic.twitter.com/0XBv97TDwh
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) August 19, 2023
भाजीपाला ही नाल्याच्या पाण्याने धुतला ...?
या दोन विक्रेत्यांनी भुईमुगाच्या शेंगा नालीच्या पाण्याने धुतल्या हे सत्य आहे. जर भुईमुगाच्या शेंगा या दोन व्यक्ती नालीच्या पाण्याने धुत असतील तर भाजीपालाही रोजच्या रोज नालीच्या पाण्याने धुत असतील, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
- निलेश इंगोले, नागरीक.