गावातील पुलाचे काम संथगतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:38 AM2021-01-08T05:38:04+5:302021-01-08T05:38:04+5:30

शेतशिवारात चोरीच्या घटना वाढल्या बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा शेतशिवारात मागील दोन महिन्यांपासून चोरीचे प्रकार घडत आहेत. आतापर्यंत अनेकांच्या ...

Village bridge work is slow | गावातील पुलाचे काम संथगतीने

गावातील पुलाचे काम संथगतीने

Next

शेतशिवारात चोरीच्या घटना वाढल्या

बासंबा : हिंगोली तालुक्यातील बासंबा शेतशिवारात मागील दोन महिन्यांपासून चोरीचे प्रकार घडत आहेत. आतापर्यंत अनेकांच्या शेतातून बोअरमधील पाईप, स्टॅटर, विद्युत मोटारपंप, छड्या व इतर शेतीपयोगी साहित्यांची चोरी झाली आहे. शेतशिवारात होणाऱ्या चोऱ्यांवर आळा घालण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी पोलिसांकडे केली आहे.

एमआयडीसी भागात रस्त्यांची दुरवस्था

संतुक पिंपरी : हिंगोली तालुक्यातील संतुक पिंपरी गावालगत असणाऱ्या एमआयडीसी भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अनेक मोठमोठे जड वाहन या भागात येत असल्याने रस्त्यावर खड्डे पडले आहेत. परंतु, याकडे कोणीही लक्ष देत नाही. खड्ड्यामुळे या भागातील वाहनचालकांना वाहने चालविताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

लोंबकळलेल्या तारांमुळे जीवितास धोका

पुसेगाव : सेनगाव तालुक्यातील पुसेगावातील विद्युततारा लोंबकळलेल्या अवस्थेत असल्यामुळे एखाद्याचा स्पर्श होवून जीवितास धोका निर्माण झाला आहे. या तारा जमिनीपासून काही अंतरावरच असून कधीही कोणाचा स्पर्श होवू शकतो, अशी स्थिती या ठिकाणी झाली आहे. तसेच गावातील लोखंडी विद्युत पोलही पूर्णपणे वाकले आहेत. यासाठी तारांची उंची वाढवावी व वाकलेले विद्युत पोल सरळ करण्याची मागणी गावकरी करीत आहेत.

नाल्या साफ करण्याची मागणी

पुसेगाव : सेनगाव तालुक्यातील पुसेगावातील वाॅर्ड क्रमांक १ आणि ५ यामधील नाल्या तुंबल्या आहेत. मागील एक वर्षापासून या नाल्यांची साफसफाई करण्यात आली नाही. या भागातील नाल्या तुंबल्यामुळे पाणी रस्त्यावर जमा होवून परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. याचबरोबर दुर्गंधी पसरत असल्याने अनेकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे.

बससेवा सुरू करण्याची मागणी

सवना : सेनगाव तालुक्यातील सवना येथे हिंगोली आगारातून येणारी बससेवा मागील आठ महिन्यांपासून बंद आहे. हिंगोली आगारातील केंद्रा बु. रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे बस बंद केली होती. आता या रस्त्याचे काम पूर्ण झाले असून अद्यापही बससेवा सुरू करण्यात न आल्यामुळे गावकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. यासाठी ही बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी सवना व परिसरातील गावकरी करीत आहेत.

गिट्टीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले

सवना : सेनगाव तालुक्यातील सवना - सवना तांडा रस्त्यावर टाकलेल्या गिट्टीमुळे अपघात होत असल्याचे दिसून येत आहे. ही गिट्टी मोकळी असून ती दाबली नसल्यामुळे या रस्त्यावर वाहने घसरून पडत आहेेत. दोन दिवसांपूर्वीच या रस्त्यावर वाहन घसरू दोघे जण गंभीर जखमी झाले होते. तसेच याठिकाणी नेहमी वाहने घसरू पडण्याच्या घटना सुरूच आहेत. यासाठी या रस्त्याचे काम करण्यात यावे अशी मागणी वाहनधारकांसह गावकऱ्यांतून होत आहे.

वानर व रानडुकरांचा उपद्रव वाढला

सवना : सेनगाव तालुक्यातील सवना गावाच्या शेतशिवारात वानर व रानडुकर घुसण्याचे प्रकार वाढले आहे. सध्या हरभरा, गह, भाजीपाल्याची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे.मात्र,याठिकाणी वानर व रानडुकर घुसून या पिकांची मोठी नासाडी करीत आहेत. यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.

Web Title: Village bridge work is slow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.