उपचारासाठी ग्रामस्थांची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:29 AM2018-10-30T00:29:30+5:302018-10-30T00:30:19+5:30

कळमनुरी तालुक्यातील करवाडी गावाला रस्ता नसल्यामुळे रूग्णांची दैना सुरूच आहे. २९ आॅक्टोबरच्या पहाटे ४ वाजता जिजाबाई घराबाहेर कामानिमित्त आल्या. पायऱ्या उतरताना त्या अचानक खाली पडल्याने गंभीर जखमी झाल्या.

 Village potholes for treatment | उपचारासाठी ग्रामस्थांची पायपीट

उपचारासाठी ग्रामस्थांची पायपीट

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदापूर : कळमनुरी तालुक्यातील करवाडी गावाला रस्ता नसल्यामुळे रूग्णांची दैना सुरूच आहे. २९ आॅक्टोबरच्या पहाटे ४ वाजता जिजाबाई घराबाहेर कामानिमित्त आल्या. पायऱ्या उतरताना त्या अचानक खाली पडल्याने गंभीर जखमी झाल्या. यावेळी सकाळी नातेवाईकांनी थेट खाटावरच १ किमी अंतर कापत आॅटोपर्यंत आणले. हिंगोली येथील जिल्हा रूग्णालयात महिलेवर उपचारासाठी आणले होते.
कळमनुरी तालुक्यातील करवाडी आदिवासीबहुल आहे. गावात जायला रस्तासुद्धा नाही. पूर्ण रस्ता माळातून आहे. नांदापूरअंतर्गत असलेल्या गावाचे चार ते पाच कि.मी. अंतर आहे. मधोमधच दोन-तीन नाले आहेत. ते पार करूनच गावाबाहेर पडावे लागते. पावसाळ्यात या गावाचा तर संपर्क तुटतो. या गरोदर मातांना, वयोवृद्ध आणि कोणताही रुग्ण खाटेवर टाकून चार ते पाच कि.मी. अंतर कापून नांदापूर येथे आणावे लागते.
२९ आॅक्टोबरच्या पहाटे ४ च्या सुमारास जिजाबाई संभाजी कºहाळे पायºयावरून उतरत असताना त्यांचा तोल जाऊन जमिनीवर कोसळल्या. त्यांना नातेवाईकांनी १ किमी पायी चालत खाटेवरच नेले. त्यानंतर आॅटोतून नांदापूर व नांदापूर येथून हिंगोली येथील जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. पायाला गंभीर मार लागल्याने फ्रॅक्चर झाल्याचे नातेवाईक सांगत होते.
गावात दवाखानाही नाही. आणि बाहेरगावी रूग्णालयात दाखल करावे तर रस्त्याअभावी वाहने येत नाहीत. गावाबाहेर पडताना मध्येच तीन नाले आहेत. ते ओलांडल्यानंतरच वाहने मिळणे शक्य आहे.

Web Title:  Village potholes for treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.