आजरसोंडा येथील ग्रामस्थांना शिधापत्रिकांची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 11:32 PM2017-12-26T23:32:28+5:302017-12-26T23:32:44+5:30
औंढा नागनाथ तालुक्यातील आजरसोंडा येथील ५० ते ६० नागरिकांना नवीन शिधापत्रिका मिळत नसल्याने शासकीय योजनांपासून वंचित रहावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जवळा बाजार : औंढा नागनाथ तालुक्यातील आजरसोंडा येथील ५० ते ६० नागरिकांना नवीन शिधापत्रिका मिळत नसल्याने शासकीय योजनांपासून वंचित रहावे लागत आहे. त्यामुळे सदर नागरिकांना प्रशासनाच्या वतीने शिधापत्रिकांचे वाटप करण्यात यावे, यासाठी आज ग्रामस्थांच्या वतीने औंढा नागनाथ येथील तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
आजरसोंडा येथील ग्रामस्थांनी आॅक्टोबर २०१६ मध्ये नवीन शिधापत्रिकेसाठी अर्ज सादर केले होते. यामध्ये नवीन नावे समाविष्ट करणे, मयतांची नावे वगळणे शिवाय स्थलांतरित झालेल्यांची नावे कमी करणे आदींचा समावेश आहे.
परंतु, अद्यापपर्यंत तहसील विभागाकडून शिधापत्रिका मिळाल्या नसल्यामुळे नागरिकांना शासकीय योजनांपासून वंचित रहावे लागत आहे. पुरवठा विभागाने याकडे लक्ष देऊन सदर नागरिकांना नवीन शिधापत्रिका देण्याची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे. निवेदनावर राष्टÑवादी तालुका युवाध्यक्ष आदित्य आहेर, कुंडलिक कदम, कल्याण राखोंडे, संजय आहेर, दिलीप राखोंडे आदींच्या स्वाक्षºया आहेत.