हिंगोलीत अतिक्रमण काढताना वाद; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 12:40 AM2018-01-10T00:40:56+5:302018-01-10T00:41:15+5:30
येथील नगर परिषद हद्दीतील मुख्य रस्त्यालगतचे अतिक्रमण हटविण्यास ९ जानेवारी रोजीपासून सुरूवात केली. मंगळवारी हिंगोली बसस्थानक व महावितरण कार्यालय परिसरातील अतिक्रमण काढण्यास पालिकेने सुरूवात केली असता न. प. च्या कर्मचाºयांसोबत काही जणांनी वाद घातला. तर स्वच्छता विभागातील महिला कर्मचाºयास मारहाण झाली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : येथील नगर परिषद हद्दीतील मुख्य रस्त्यालगतचे अतिक्रमण हटविण्यास ९ जानेवारी रोजीपासून सुरूवात केली. मंगळवारी हिंगोली बसस्थानक व महावितरण कार्यालय परिसरातील अतिक्रमण काढण्यास पालिकेने सुरूवात केली असता न. प. च्या कर्मचाºयांसोबत काही जणांनी वाद घातला. तर स्वच्छता विभागातील महिला कर्मचाºयास मारहाण झाली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
हिंगोली शहरातील अतिक्रण हटविण्यास पालिकेने मंगळवारपासून सुरूवात केली आहे. न. प. चे मुख्याधिकारी व प्रशासकीय यंत्रणा पोलीस बंदोबस्तात हिंगोली बसस्थानक परिसरातील अतिक्रमण काढून घेत होती. अतिक्रमण काढताना यावेळी काही अतिक्रमणधारकांनी वाद घालत पालिकेचे अधिकारी तसेच कर्मचाºयांना अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तसेच मारहाण केल्याने काही महिला कर्मचाºयांना जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले होते. यावेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी नगर अभियंता मनीष राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राजेंद्र दुबे, तसेच त्यांच्या पत्नी व मुलीविरूद्ध हिंगोली शहर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोली शहरातील नगर परिषद हद्दीतील बिरसा मुंडा चौक, देवडानगर, एनटीसी, औंढा रोड, बसस्थानक, महावितरण कार्यालय, इंदिरा गांधीचौक, महेश चौक, महावीर चौक, आंबेडकर चौक, रेल्वेस्टेशन रोड, जुने पोलीस अधीक्षक कार्यालय, टपाल कार्यालय रोड, अष्टविनायक चौक, खुराणा पेट्रोल पंपाजवळील परिसर, जवाहर रोड, भाजीमंडई, पलटण मस्जीद, अकोला रोड, पिपल्स बँक परिसर, न्यायालयासमोर, पलटण पाण्याची टाकीजवळील, रिसाला नाका व शहरातील मुख्य रस्त्यालगतचे तसेच इतर प्रमुख रस्त्यावरील अतिक्रमण हटविले जाणार आहे.
प्रतिसाद नाही... अतिक्रमण स्वत:हून काढून घ्यावीत याबाबत पालिकेने यापूर्वीच सूचनाही दिल्या होत्या. परंतु अनेकांनी अतिक्रमण काढूनच घेतली नाही. त्यामुळे आज अतिक्रमण काढताना वाद झाला. छोट्या टपरीधारक व्यापाºयांना उदरनिर्वाहाचे एकमेव साधन म्हणजे छोटी दुकाने व हॉटेल आहेत. त्यामुळे काही व्यापारी अतिक्रमण काढण्यास विरोध करीत आहेत. परंतु अतिक्रमणांमुळे शहरातील वाहतुकी व स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाल्याने ती काढून घेतली जात आहेत.
उपचार : अधिकारी-कर्मचाºयांना शिवीगाळ
नगर परिषदेच्या महिला सफाई कामगार धु्रपता तुकाराम हतागळे, साधना खडसे व गंगाबाई गायकवाड यांना रवींद्र दुबे, त्याची पत्नी व मुलीने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तसेच पालिकेच्या अधिकारी व कर्मचाºयांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा केला. न.प. हद्दीतील अतिक्रमण हटाव मोहिमेत पहिल्याच दिवशी वाद उफाळला. यावेळी मात्र बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. मात्र कोणाची गय न केल्याने इतरांनी स्वत:हून अतिक्रमण काढून घेतले. पोलिस बंदोबस्तात ही कारवाई सुरू आहे.