खरबी येथे निवडणुकीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:32 AM2021-09-18T04:32:17+5:302021-09-18T04:32:17+5:30

याप्रकरणी ज्योती खेन्नाजी पवार यांनी पोलिसाांना दिलेल्या तक्रारीत म्हटले की, ज्योती पवार व त्यांचे पती घरासमोर सार्वजनिक जागी बसले ...

Violent clashes between two groups over election dispute in Kharbi | खरबी येथे निवडणुकीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी

खरबी येथे निवडणुकीच्या वादातून दोन गटात तुंबळ हाणामारी

Next

याप्रकरणी ज्योती खेन्नाजी पवार यांनी पोलिसाांना दिलेल्या तक्रारीत म्हटले की, ज्योती पवार व त्यांचे पती घरासमोर सार्वजनिक जागी बसले असता आरोपींनी हातात काठ्या, लोखंडी गज घेऊन तू ग्रामपंचायत सदस्य आहेस. आमच्या पार्टीत का येत नाहीस, असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच थापडबुक्यांनी मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी आलेल्याससुद्धा हातातील लोखंडी गज, काठ्यांनी मारहाण करत आरोपींनी जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. याप्रकरणी ज्योती पवार यांच्या फिर्यादीवरून प्रकाश सखाराम बोचरे, हनुमान एकनाथ बोचरे, गजानन काशिराम बोचरे, गोविंदा त्र्यंबक बोचरे, जगन रामकिशन बोचरे, सुभाष श्रीराम बोचरे, हनुमान राघुजी बोचरे, विनोद शिवाजी बोचरे याचेविरूद्ध गुन्हा नोंद झाला आहे.

तर दुसरी फिर्यादी सुमन शेषराव चव्हाण यांनी दिली. त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले की, सुमन चव्हाण व त्यांचे पती घरासमोर सार्वजनिक जागी बसले असताना आरोपींनी तू आमच्या विरोधी लोकांचा निवडणुकीमध्ये प्रचार का केला. या कारणावरून जातीवाचक शिवीगाळ केली. यावेळी गावातील हनुमान बोचरे व राघुजी बोचरे हे मदतीला आले असता त्यांनाही थापडाबुक्क्यांनी मारहाण करून धमकी दिली. तसेच जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले. याप्रकरणी सुमन चव्हाण यांच्या फिर्यादीवरून रामदास पुंजाजी सपाटे, देवानंद लक्ष्मण सपाटे, विष्णू किशन सपाटे, प्रकाश श्यामराव सपाटे, नामदेव राजाराम सपाटे, बद्री बळीराम बोचरे, कुंडलिक बळीराम सपाटे, एकनाथ अप्पाजी सपाटे, बालाजी भगवान सपाटे याचेविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी व्ही. टी. वाखारे करीत आहेत.

पोलिसांची घटनास्थळी भेट

खरबी येथे दोन गटात हाणामारी होत असल्याची घटना समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी व्ही. टी. वाखारे, पोलीस निरीक्षक आर. एन. मळघणे, पोलीस उपनिरीक्षक के. डी. पोटे यांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही गटाला शांत केले.

Web Title: Violent clashes between two groups over election dispute in Kharbi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.