समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत गावांना भेटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:26 AM2021-02-20T05:26:46+5:302021-02-20T05:26:46+5:30
कळमनुरी तालुक्यातील बाेल्डावाडी, सालेगाव, नवखा, शिवनी खुर्द, आदीं गावांना भेटी देऊन ग्रामस्थांना समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत मार्गदर्शन केले. जलसंधारणाच्या कामातून ...
कळमनुरी तालुक्यातील बाेल्डावाडी, सालेगाव, नवखा, शिवनी खुर्द, आदीं गावांना भेटी देऊन ग्रामस्थांना समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत मार्गदर्शन केले. जलसंधारणाच्या कामातून गाव समृद्ध होते. त्यामुळे जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. बोल्डावाडी येथे भेट देऊन विविध प्रकारच्या शेतीपूरक व्यवसायांवर चर्चा केली. सालेगाव येथे बळिराम देशमुख यांच्या पपई लागवड व अंतर्गत मिरची लागवड या शेतीला भेट देऊन त्यांनी पाहणी केली. नवखा येथे सीताफळ व जाब या शेतीला भेट देऊन गावातील जलमित्रांसोबत मिनी स्पर्धा याविषयी चर्चा करून सविस्तर माहिती दिली. त्यानंतर त्यांनी गोदा फार्मलाही भेट देऊन तेथील शेतमालाची होणारी प्रक्रिया याविषयी चर्चा करून तेथील कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. शिवनी खुर्द येथे भेट देऊन समृद्ध गाव स्पर्धेच्या सहा स्तंभांवर ग्रामस्थांना मार्गदर्शन करीत चर्चा केली. यावेळी संतोष शिनगारे, भागवत कोटकर, ग्रामसेवक, कृषी सहायक, तलाठी व ग्रामस्थ, आदींची उपस्थिती होती.
फाेटाे नं. ०७