७ ग्रामपंचायतीत एक-दोन जागेसाठी मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:22 AM2021-01-10T04:22:22+5:302021-01-10T04:22:22+5:30

कळमनुरी तालुक्यातील रेणापूर, खापरखेडा येथे प्रत्येकी २ पार्डी, जांभरून, डोंगरगाव पूल, गारोळ्याची वाडी येथे प्रत्येकी एक सदस्यसाठी निवडणूक ...

Voting for one or two seats in 7 Gram Panchayats | ७ ग्रामपंचायतीत एक-दोन जागेसाठी मतदान

७ ग्रामपंचायतीत एक-दोन जागेसाठी मतदान

Next

कळमनुरी तालुक्यातील रेणापूर, खापरखेडा येथे प्रत्येकी २ पार्डी, जांभरून, डोंगरगाव पूल, गारोळ्याची वाडी येथे प्रत्येकी एक सदस्यसाठी निवडणूक होणार आहे. या ७ ग्रामपंचायती निवडून आलेल्या आहेत. तालुक्यातील घोळवा, येगाव या दोन ग्रामपंचायतीत उमेदवाराचे वय २१ नसल्यामुळे त्यांचा उमेदवारी अर्ज निकाली काढण्यात आलेले आहेत. त्यामुळे या दोन ग्रामपंचायतीत मतदान होणार नाही. तालुक्‍यातील एकूण ९२ ग्रामपंचायतीत ६२५ जागांसाठी १,३६० उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. तालुक्‍यातील बिबगव्हाण, कवडा, कुंभारवाडी, कोपरवाडी, नवखा, पुयना, रामेश्वर, टव्हा, उमरदरा वाडी, माळेगाव, डोंगरगाव नाका, तेलंगवाडी, येळेगाव गवळी या पंधरा ग्रामपंचायती बिनविरोध निवडून आलेल्या आहेत. तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी ६२,५८० पुरुष व ५७,०४२ महिला असे एकूण १,१९,६२२ मतदार आहेत. तालुक्यात १९ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. येथे पोलिसांचा कडक बंदाेबस्त राहणार आहे.

तालुक्यात २७६ मतदान केंद्रे आहेत. मतदान प्रक्रियेबाबत मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांना १० जानेवारी रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वसतिगृह येथे दुसरे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतींमध्ये १४१ सदस्य बिनविरोध निवडून आलेले आहेत. या गावांमध्ये उर्वरित जागेसाठी १५ जानेवारी रोजी मतदान हाेणार असून १८ जानेवारीला येथील तहसील कार्यालयात मतमोजणी होणार आहे. प्रशासनाने मतदान प्रक्रियेचे सर्व तयारी पूर्ण केलेली आहे. सध्या निवडणूक रिंगणात ५८६ पुरुष ७७४ महिला असे एकूण १,३६० उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

Web Title: Voting for one or two seats in 7 Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.