बोंडअळीच्या तिसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 12:06 AM2018-09-16T00:06:13+5:302018-09-16T00:06:33+5:30

जिल्ह्यातील कापूस उत्पादकांना गतवर्षीच्या नुकसानीबाबत भरपाईचा तिसरा टप्पा मिळण्याची प्रतीक्षा शेतकºयांना आहे. कपासीचा यंदाचा हंगामही वाया जात असला तरीही पूर्वीचेच अनुदान अजून खात्यावर नसल्याने बोंब सुरू आहे.

 Wait for the third phase of the bollwind | बोंडअळीच्या तिसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा

बोंडअळीच्या तिसऱ्या टप्प्याची प्रतीक्षा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यातील कापूस उत्पादकांना गतवर्षीच्या नुकसानीबाबत भरपाईचा तिसरा टप्पा मिळण्याची प्रतीक्षा शेतकºयांना आहे.
कपासीचा यंदाचा हंगामही वाया जात असला तरीही पूर्वीचेच अनुदान अजून खात्यावर नसल्याने बोंब सुरू आहे. या टप्प्यात १२.२0 कोटी रुपये मिळणे अपेक्षित आहे.हिंगोली जिल्ह्यात गतवर्षी बोंडअळीच्या नुकसानीचा सर्व्हे करताना त्याचे निकषच अनेकदा बदलले. त्यानंतर पाठविलेल्या प्रस्तावावरही कमीत कमी अनुदान देण्याची वेळ शासनावर यावी, यासाठी अनेक बाजूने तपासणी करून नंतर अनुदान मंजूर केले. याता हिंगोली जिल्ह्याला ३६.६0 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. तीन टप्प्यांत हा निधी वितरित करण्यात येणार होता. यापूर्वी प्रत्येकी १२.२0 कोटींचे दोन हप्ते जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले होते. या दोन्ही हप्त्यांचे वितरण झाले असून शेतकºयांच्या खात्यावरही ही रक्कम जमा करण्यात आली आहे. तर जिल्हा प्रशासनाने तिसºया टप्प्याच्या १२.२0 कोटी रुपयांची मागणीही शासनाकडे केली आहे. पूर्वीची रक्कम वाटप झाल्याशिवाय नवीन अनुदान वितरित न करण्याचा शासनाचा आदेश असल्याने नाहक मागील काही दिवसांपासून ही प्रक्रिया लांबत पडलेली आहे; परंतु पूर्वीचे निधी वितरण झाल्यावरही नवीन निधी मिळत नसल्याने अनेक गावांतून बोंडअळीच्या अनुदानासाठी ओरड सुरू आहे.
विभागीय आयुक्तालयात निधी आल्याने लवकरच तो जिल्हा स्तरावर मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Web Title:  Wait for the third phase of the bollwind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.