पाथरी रेल्वे गेटला उड्डाणपुलाची प्रतीक्षा
By admin | Published: November 20, 2014 03:04 PM2014-11-20T15:04:26+5:302014-11-20T15:04:26+5:30
पाथरी रोडवरील रेल्वे गेट २४ तासातून तब्बल ३0 ते ३४ वेळा बंद चालू करण्यात येत असल्यामुळे चोवीस तासांतून तब्बल तीन तास हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होत आहे.
Next
मोहन बोराडे /सेलू
रेल्वे/ गाड्यांची वाढती संख्या व त्या प्रमाणात वाहनांची वर्दळ वाढत असताना पाथरी रोडवरील रेल्वे गेट २४ तासातून तब्बल ३0 ते ३४ वेळा बंद चालू करण्यात येत असल्यामुळे चोवीस तासांतून तब्बल तीन तास हा रस्ता वाहतुकीसाठी बंद होत आहे. त्यामुळे या रस्त्यावर उड्डणपुलाची उभारणी करणे आवश्यक झाले आहे.
सेलू पाथरी रस्त्यावर रेल्वे गेट असून ये जा करणार्या प्रत्येक रेल्वे गाडीसाठी किमान पाच ते सहा मिनिटे गेट लावण्यात येते. रेल्वेगाड्यांची संख्या पाहता वारंवार हे गट बंद चालू दरम्यान चोवीस तासांत तीन तास बंद राहते. अशावेळी वाहनांची प्रचंड कोंडी या रस्त्यावर होत आहे. सेलू रेल्वे स्थानकात चोवीस तासात तब्बल २८ रेल्वे गाडया ये जा करतात. या रेल्वे गाडयांना सेलू स्थानकाचा थांबा आहे. या शिवाय स्थानकावर न थांबणार्या नांदेड-अमृतसर सचखंड एक्स्प्रेस, नरसापुर-नगरसोल, चेन्नई-नगरसोल, कोल्हापूर-धनबाद या रेल्वेगाड्या ये जा करताना रेल्वे गेट बंद करावे लागते. चोवीस तासातून जवळपास ३४ रेल्वे गाडया ये जा करत असल्यामुळे काही तासातच पाथरी रस्त्याच्या गेट बंद चालू होते. दरवर्षी रेल्वे गाड्यांची संख्या वाढत असतांना यारस्त्यावर उड्डणपुलाच्या उभारणीला मात्र अद्यापही सुरूवात झालेली नाही. रात्रीच्या वेळी ये जा करणार्या गाडयांची संख्या अधिकची आहे. त्यामुळे जड वाहने या रस्त्यावर उभी राहतात. पाथरी आगारातून सेलू बसस्थानकात व ग्रामीण भागात सोडण्यात येणार्या बसगाडया याच मार्गावरून सेलू येथे येतात. अनेक वेळा रेल्वे गेट बंद असल्यामुळे या गाडया विलंबाने धावतात. तसेच पाथरी रस्त्यावर अनेक तालुक्यातील खेडे सेलू शहराला जोडलेली आहेत. त्यामुळे शेतीमाल व शिक्षणासाठी विविध वाहनांतून सेलू येथे येणार्यांची मोठी संख्या असते. तसेच दुचाकी वाहनांची या रस्त्यावर वर्दळ असते. परंतू रेल्वे गेट बंद होताच या रस्त्याची वाहतुक ठप्प होवून वाहतुकीची कोंडी निर्माण होते. त्यामुळे रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनांचे छोटे-मोठे अपघात नेहमी घडतात. / ■ पाथरी रेल्वे गेटच्या पलीकडे नव्याने वस्ती वाढू लागली आहे. तसेच श्रीराम प्रतिष्ठाणचे विद्याविहार संकुल रवळगाव परिसरात आहे. या प्रतिष्ठाण मध्ये शेकडो विद्यार्थी शिक्षणासाठी येतात.
४/रेल्वे गेट ओलांडल्या शिवाय दुसर्या कुठलाच रस्त्याचा पर्याय नाही. वारंवार रेल्वे गेट बंद असल्याकारणामुळे नागरिकांसह विद्यार्थ्यांना गेटवर ताटकळत रेल्वेची वाट पाहत उभे रहावे लागते. तसेच दोन रेल्वे गाड्यांचे सेलू रेल्वे स्थानकात क्रॉसिंग असल्यास जवळपास आठ ते दहा मिनिट गेट बंद राहते.
४/अनेक वेळा रेल्वे गेट बंद झाल्यानंतर विद्यार्थ्यांना जाण्यास विलंबही होतो. अनेक वेळा गेट बंद असतानाही त्या खालून दुचाकी काढण्याचा प्रयत्न काही व्यक्ती करतात. जीवाची पर्वा न करतात काहींची ही कसरत सुरू असते. वाहन व रेल्वे गाडींची संख्या लक्षात घेवून या ठिकाणी उड्डणपुल किंवा भुयारी मार्ग करणे आवश्यक झाले आहे.