जिल्हा रग्णालयात वर्ग एकच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची वानवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:30 AM2021-07-28T04:30:54+5:302021-07-28T04:30:54+5:30
हिंगोली : गरिबांचा दवाखाना म्हणून ओळख असलेल्या जिल्हा रुग्णालयात मागील पाच वर्षांपासून वर्ग १च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरली ...
हिंगोली : गरिबांचा दवाखाना म्हणून ओळख असलेल्या जिल्हा रुग्णालयात मागील पाच वर्षांपासून वर्ग १च्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरली गेली नाहीत. त्यामुळे अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
गत पाच वर्षांपासून जिल्हा रुग्णालय प्रशासनाने वर्ग एकच्या वैद्यकीय अधिकाऱ्याची रिक्त पदे भरावीत म्हणून शासनाकडे मागणी केली आहे. परंतु आजपर्यत रिक्त पदे भरली गेली नाहीत. त्यामुळे सध्या कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना कारभार चालवावा लागत आहे.
हिंगोली जिल्हा होऊन आजमितीस जवळपास २१ वर्षे झाली आहेत. मागील कित्येक वर्षांपासून वर्ग एकच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे भरली नाहीत. जिल्हा रुग्णालयात त्वचा विभाग, स्त्री रोग विभाग, कान, नाक, घसा विभाग, नेत्ररोग विभाग आणि मानसिकरोग विभाग असे पाच विभाग आहेत. या विभागांसाठी सध्या वैद्यकीय अधिकारीच आहेत. परंतु वर्ग एक व दोनच्या जागा भरल्या नाहीत.
बाँक्स...
जिल्हा रुग्णालयात त्वचारोग विभाग महत्त्वाचा आहे. या ठिकाणी वर्ग १ व २ अशी पदे रिक्त आहेत. त्वचा म्हटले की, त्यात त्वचारोग, संसर्ग आजार, एड्स यांसारख्या आजारावर उपचार, लैंगिक आजार, लैंगिक समस्या यावर उपचार करावा लागतो. पण आजमितीस नियुक्त असलेले वैद्यकीय अधिकारी काम पाहात आहेत.
प्रतिक्रिया....
गत पाच वर्षांपासून पाचही विभागातील वर्ग एकच्या रिक्त जागांसंबंधी शासनाकडे पाठपुरावा केला आहे. एवढे असतानाही सध्या वैद्यकीय अधिकारी वर्गाकडून उपचार करून घेऊन रुग्णांची गैरसोय होऊ दिली जात नाही. शासनाकडून सूचना आल्यास रिक्त पदे लवकरच भरली जातील.
डाॅ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा शल्य चिकित्सक