हिंगोली जिल्ह्यातील ५३ गावांत पाणीनमुने दूषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 16:12 IST2019-03-14T16:12:09+5:302019-03-14T16:12:33+5:30
उन्हाळा लागला असल्याने टंचाईत अशा स्त्रोतांचा वापर होण्याचा धोका असतो.

हिंगोली जिल्ह्यातील ५३ गावांत पाणीनमुने दूषित
हिंगोली : जिल्ह्यात विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तपासण्यात आलेल्या ३९१ पाणीनमुन्यांपैकी ६७ पाणीनमुने दूषित आढळले आहेत. ५३ गावांतील हे पाणीनमुने आहेत.
हिंगोली जिल्ह्यात दर महिन्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून अणुजीव तपासणीसाठी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा व लघुप्रयोगशाळेकडे पाणी नमुने पाठविण्यात येतात. यात बऱ्याचदा सर्व गावांतील पाणीनमुने घेतले जात नाहीत. या नमुन्यांची तपासणी झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचायतींना सदर स्त्रोताविषयी कळविले जाते. काही ग्रामपंचायती उपाय योजतात. मात्र काही ग्रामपंचायतींकडून त्यावर उपाययोजनाच होत नाहीत. आता उन्हाळा लागला असल्याने टंचाईत अशा स्त्रोतांचा वापर होण्याचा धोका असतो. त्यामुळे या काळात दक्षता घेणे गरजेचे आहे.
औंढा तालुक्यातील जवळा बाजार, चिंचोली, पोटा बु., ढेगज, भोसी, जांभळी, अंजनवाडी अशा एकूण आठ गावांमध्ये पाणीनमुने दूषित आढळले आहेत. वसमत तालुक्यात पळसगाव, मुरुंबा, हरगाव, इंजनगाव प., चंदनगव्हाण, साखर कारखाना, बोराळा, भेंडेगाव, नहाद, कुडाळा, पुयनी बु., हिडगाव या बारा गावांत, हिंगोली तालुक्यात कोथळज, सावरखेडा, बासंबा, बळसोंड, सायाळा, नवखा, फाळेगाव, देवठाणा, अंबाळा, अंबाळा तांडा, आडगाव, लिंबाळा, माळहिवरा, खंडाळा, चिंचाळा, वेलतुरा, एकांबा कळमनुरीत येहळेगाव, येगाव, सालेगाव, नांदापूर, येहळेगाव, तेलंगवाडी, कांडली, आडा, बहुर, कुंभारवाडी, येडशी, वाई या १२ गावांत, तर सेनगाव तालुक्यात जयपूर, कहाकर, वेलतुरा, सिनगी नाका, कारेगाव, वटकळी, सावरखेडा, दाताडा खु., दाताडा बु., पानकनेरगाव या दहा गावांमध्ये पाणीनमुने दूषित आढळले.