हिंगोली बसस्थानकात पाणीच पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:19 AM2021-07-09T04:19:50+5:302021-07-09T04:19:50+5:30
हिंगोली : येथील बसस्थानकात बुधवारी रात्री झालेल्या पावसाचे पाणी साचल्यामुळे प्रवाशांना चिखलातून ये- जा करावी लागत आहे. दुसरीकडे बसस्थानकात ...
हिंगोली : येथील बसस्थानकात बुधवारी रात्री झालेल्या पावसाचे पाणी साचल्यामुळे प्रवाशांना चिखलातून ये- जा करावी लागत आहे. दुसरीकडे बसस्थानकात कोणत्याही सोयी-सुविधा नसल्यामुळे अनेक समस्यांना प्रवाशांना सामोरे जावे लागत आहे.
हिंगाेलीत नवीन बसस्थानकाचे काम गत काही महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे प्रवाशांसाठी तात्पुरत्या स्वरुपात पत्राच्या शेडमध्ये बसस्थानक उभे आहे. बुधवारी झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. बसस्थानकात पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे चालकाला बस स्थानकाच्या बाहेर काढताना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. बसस्थानकात प्रवाशांसाठी सोयी-सुविधा द्यावी, अशी मागणी अनेकवेळा प्रवाशांनी आगारप्रमुखांकडे केली आहे. परंतु, आगारप्रमुखांनी अद्यापपर्यंत याकडे लक्ष दिलेले दिसत नाही.
- कसरत करुन बस काढावी लागते बाहेर...
नवीन बसस्थानकाचे काम गत काही महिन्यांपासून रखडले आहे. बसस्थानकात येण्यासाठी आणि जाण्यासाठी दोन प्रवेशद्वार आहेत. परंतु, दोन्ही प्रवेशद्वावर तसेच, बसस्थानकात खड्डेच खड्डे झाले आहेत. सद्य:स्थितीत बसस्थानकात पाऊस पडल्यामुळे पाणीच पाणी झाले आहे. बस बाहेर काढते वेळेस किंवा बस स्थानकात आणते वेळेस हळूवारपणे चालवावी लागते. खड्ड्यांमुळे बसचे अतोनात नुकसान होत आहे. चालकाला मोठ्या प्रमाणात करावी लागत आहे, असे चालकांनी सांगितले.
फोटो ३