५३ गावांत पाणीनमुने दूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:01 AM2019-03-14T00:01:47+5:302019-03-14T00:02:15+5:30

जिल्ह्यात विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तपासण्यात आलेल्या ३९१ पाणीनमुन्यांपैकी ६७ पाणीनमुने दूषित आढळले आहेत. ५३ गावांतील हे पाणीनमुने आहेत. आता उन्हाळ्यात टंचाईच्या काळात याकडे लक्ष देण्याची गरज असून दूषित पाणीपुरवठ्यामुळे आजार बळावण्याची शक्यता आहे.

 Water pollution in 53 villages | ५३ गावांत पाणीनमुने दूषित

५३ गावांत पाणीनमुने दूषित

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत तपासण्यात आलेल्या ३९१ पाणीनमुन्यांपैकी ६७ पाणीनमुने दूषित आढळले आहेत. ५३ गावांतील हे पाणीनमुने आहेत. आता उन्हाळ्यात टंचाईच्या काळात याकडे लक्ष देण्याची गरज असून दूषित पाणीपुरवठ्यामुळे आजार बळावण्याची शक्यता आहे.
हिंगोली जिल्ह्यात दर महिन्यात प्राथमिक आरोग्य केंद्रांकडून अणुजीव तपासणीसाठी जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा व लघुप्रयोगशाळेकडे पाणी नमुने पाठविण्यात येतात. यात बऱ्याचदा सर्व गावांतील पाणीनमुने घेतले जात नाहीत. त्यामुळे याबाबत सुधारणा होणे अपेक्षित आहे. या नमुन्यांची तपासणी झाल्यानंतर संबंधित ग्रामपंचयातींना सदर स्त्रोताविषयी कळविले जाते. काही ग्रामपंचायती उपाय योजतात. मात्र काही ग्रामपंचायतींकडून त्यावर उपाययोजनाच होत नाहीत. आता उन्हाळा लागला असल्याने टंचाईत अशा स्त्रोतांचा वापर होण्याचा धोका असतो. त्यामुळे या काळात दक्षता घेणे गरजेचे आहे.
औंढा तालुक्यातील जवळा बाजार, चिंचोली, पोटा बु., ढेगज, भोसी, जांभळी, अंजनवाडी अशा एकूण आठ गावांमध्ये पाणीनमुने दूषित आढळले आहेत. वसमत तालुक्यात पळसगाव, मुरुंबा, हरगाव, इंजनगाव प., चंदनगव्हाण, साखर कारखाना, बोराळा, भेंडेगाव, नहाद, कुडाळा, पुयनी बु., हिडगाव या बारा गावांत, हिंगोली तालुक्यात कोथळज, सावरखेडा, बासंबा, बळसोंड, सायाळा, नवखा, फाळेगाव, देवठाणा, अंबाळा, अंबाळा तांडा, आडगाव, लिंबाळा, माळहिवरा, खंडाळा, चिंचाळा, वेलतुरा, एकांबा कळमनुरीत येहळेगाव, येगाव, सालेगाव, नांदापूर, येहळेगाव, तेलंगवाडी, कांडली, आडा, बहुर, कुंभारवाडी, येडशी, वाई या १२ गावांत पाणीनमुने दूषित आढळले. तर सेनगाव तालुक्यात जयपूर, कहाकर, वेलतुरा, सिनगी नाका, कारेगाव, वटकळी, सावरखेडा, दाताडा खु., दाताडा बु., पानकनेरगाव या दाहा गावांमध्ये पाणीनमुने दूषित असल्याचे आढळून आले आहे.
असे आहे चित्र : तालुकानिहाय स्थिती
औंढा तालुक्यात ६३ पैकी ९, वसमतला ८0 पैकी १२, हिंगोलीत ९0 पैकी २0, कळमनुरीत १0७ पैकी १३, सेनगावात ५१ पैकी १३ पाणीनमुने दूषित आढळले आहेत. सर्वाधिक २५ टक्के पाणीनमुने सेनगाव तालुक्यात दूषित असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या तालुक्याने जास्त खबरदारी घेण्याची गरज आहे. तर हिंगोली तालुक्यात सर्वांत जास्त १७ गावांत पाणीनमुने दूषित आढळून आले आहेत. त्यामुळे या तालुक्यालाही तेवढीच खबरदारी घ्यावी लागणार आहे. मात्र दरवर्षीच केवळ कागदी घोडे नाचविले जातात, हा अनुभव आहे.
पाणीटंचाई असो वा नसो; शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतींना नियमित सूचना दिल्या जातात. मात्र त्यांचे पालन होते की नाही, याची तपासणी कोणीच करत नाही.

Web Title:  Water pollution in 53 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.