इसापूरवरून ६६ गावांना पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 23:39 IST2019-09-24T23:39:03+5:302019-09-24T23:39:20+5:30
तालुक्याला लागूनच असलेल्या इसापूर धरणात सध्या २८.०९ टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. या धरणातून विदर्भ व कळमनुरीसह तालुक्यातील गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो.

इसापूरवरून ६६ गावांना पाणीपुरवठा
लोकमत न्यूज नेटवर्क
कळमनुरी : तालुक्याला लागूनच असलेल्या इसापूर धरणात सध्या २८.०९ टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. या धरणातून विदर्भ व कळमनुरीसह तालुक्यातील गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो.
पावसाळा संपत आला तरीही ५५ ते ६० टक्केच सरासरी पाऊस पडला आहे. सध्या धरणाची पाणी पातळी ४३१.९६ मीटर आहे. उपयुक्त पाणीसाठा २७०.८३ दलघमी एवढा आहे. जुलै महिन्यात नांदेडसाठी १.७३९१ दलघमी पाणी सोडण्यात आले होते. या धरणातून विदर्भातील ४० कळमनुरी तालुक्यातील २५ गावांना व कळमनुरी शहर अशा एकूण ६६ गावांना या धरणातून पिण्यासाठी पाणी सोडल्या जाते. उन्हाळी हंगामातच पिकांसाठी उजव्या व डाव्या कालव्यातून पाणी सोडले होते. जून महिन्यांपासून हे दोन्ही कालवे बंद आहेत. कळमनुरी तालुक्यात आतापर्यंत ५२३.९ मि.मी.च पाऊस पडला आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे ७२ टक्के धरण रिकामेच आहे. कडक ऊन व बाष्पीभवनामुळे धरणातील पाणी झपाट्याने आटते. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने धरण काही भरत नाही. ८ महिन्यात धरणातील साठा कमी होईल, असे वर्तविण्यात येत आहे. धरणातून दरवर्षी पिके व पिण्यासाठी पाणी सोडल्या जाते. पाऊस नसल्याने धरण काही भरत नाही. धरणात येणारी पाण्याची आवक कमीच होत चालली आहे.