पाणीपट्टी, घरपट्टी वसुली ५0 टक्क्यांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 12:53 AM2017-12-26T00:53:55+5:302017-12-26T00:54:02+5:30

जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची पाणीपट्टी व घरपट्टी वसुली ही ५0 टक्क्यांच्या आत असून गेल्यावर्षी नोटाबंदीत अनेक ग्रामपंचायतींनी चांगली वसुली केली.

Water tax, property tax recovery at 50 percent | पाणीपट्टी, घरपट्टी वसुली ५0 टक्क्यांवर

पाणीपट्टी, घरपट्टी वसुली ५0 टक्क्यांवर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींची पाणीपट्टी व घरपट्टी वसुली ही ५0 टक्क्यांच्या आत असून गेल्यावर्षी नोटाबंदीत अनेक ग्रामपंचायतींनी चांगली वसुली केली. तर अनेकांना मध्यवर्ती बँकेतील खात्यामुळे वसुलीत अडचणी आल्या. यंदा मात्र नोव्हेंबरअखेरच ५0 टक्क्यांच्या आसपास वसुली झाली आहे.
ग्रामपंचायतींच्या पाणीपट्टी व घरपट्टी वसुलीचे प्रमाण कमी असल्याने विकासकामांवर तर परिणाम होतोच. शिवाय अनेकदा वीजबिल न भरल्याने गावातील पाणीपुरवठा योजनाच बंद राहात असल्याचे प्रकार घडतात. विशेष म्हणजे ग्रामपंचायतींनी वीजदेयक भरल्यानंतर पाणीपुरवठा विभागास सादर केल्यास ५0 टक्के रक्कम परतही मिळते. मात्र त्यातही अनेक ग्रामपंचायती रस दाखवत नाहीत, हा अनुभव आहे. त्यामुळे या योजनेचा लाभ मिळत नाही.
पाचही तालुक्यांचा घरपट्टीचा विचार केला तर गतवर्षीची ७९.२४ लाखांची थकबाकी आहे. तर २0१७-१८ या आर्थिक वर्षात ५.४४ कोटींचे उद्दिष्ट आहे. थकबाकीपैकी ४४.१0 लाख वसूल झाले असून चालू वसुलीपैकी २.६३ कोटी रुपयांची वसुली झाली आहे. वसुलीचे हे प्रमाण ४९.२८ टक्के एवढे आहे. हिंगोली, कळमनुरी व सेनगाव तालुक्यातच ५0 टक्क्यांच्या पुढे वसुली आहे. तर आणखी चार महिने शिल्लक आहेत.

Web Title: Water tax, property tax recovery at 50 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.