जलमृदसंधारण कामास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 12:36 AM2018-09-28T00:36:12+5:302018-09-28T00:36:26+5:30
ग्राम सामाजिक परिवर्तन अभियाना अर्तगत तालुक्यातील जामदया येथे वन जमीनीवर जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते जलमृदसंधारण कामाचे भूमिपूजन करुन प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी भंडारी यांनी सदर अभियान गतीमान पध्दतीने राबवून यशस्वी करण्याचे आवाहन केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेनगाव : ग्राम सामाजिक परिवर्तन अभियाना अर्तगत तालुक्यातील जामदया येथे वन जमीनीवर जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते जलमृदसंधारण कामाचे भूमिपूजन करुन प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी भंडारी यांनी सदर अभियान गतीमान पध्दतीने राबवून यशस्वी करण्याचे आवाहन केले.
वनपरिक्षेत्र कार्यालय सेनगांव चा वतीने गुरुवारी तालुक्यातील जामदया येथे जलमृद संधारण कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते कामाचे भुमिपूजन करण्यात आले. यावेळी विभागीय वनधिकारी केशव वाबळे, सहाय्यक वनधिकारी पवार, गटविकास अधिकारी किशोर काळे, वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील शिंदे, सरपंच गायकवाड यांच्यासह वन कर्मचारी उपस्थिती होते. तालुक्यातील लिंगदरी, जामदया, गोडाळा, खिलार या चार गावांची ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानात निवड झाली असून शासकीय मशीन मार्फत वनजमीनीवर हि कामे करण्यात येणार आहेत.