जलवाहिनी फुटल्याने पाण्याचा अपव्यय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 12:01 AM2018-12-26T00:01:18+5:302018-12-26T00:01:46+5:30
शहरातील पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जागोजागी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी सध्या दुष्काळाच्या परिस्थितीतही वाया जात आहे. त्यामुळे रस्त्यांवर चिखल झाला आहे. शहरातील सम्राट कॉलनी भागातील कच्च्या रस्त्यावर पडलेल्या खड्यांमध्ये पाणी साचून डबके तयार झाले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वसमत : शहरातील पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जागोजागी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी सध्या दुष्काळाच्या परिस्थितीतही वाया जात आहे. त्यामुळे रस्त्यांवर चिखल झाला आहे. शहरातील सम्राट कॉलनी भागातील कच्च्या रस्त्यावर पडलेल्या खड्यांमध्ये पाणी साचून डबके तयार झाले आहेत.
नगरपालिकेकडून अपुऱ्या जलसाठ्यामुळे आठ-दहा दिवसाला एकदा पाणी येते. दुष्काळी परिस्थिती नागरिकांना पाण्याची आठ-आठ दिवस वाट पाहावी लागते. परंतु नगरपालिका प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे जलवाहिन्यांकडे दुर्लक्ष होत आहे. अल्प पर्जन्यमानामुळे पाणी पातळी खालावली असून अनेकांचे बोअरही आटले आहेत. त्यामुळे शहरात पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला आहे. नगरपालिकेसमोरील रस्त्यावर जलवाहिनी फुटल्याने येथून पाणी वाहात आठवडी बाजारात साचत आहे. त्यामुळे बाजारात ये-जा करणाºया नागरिकांना आणि व्यापाºयांना त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे दुष्काळामुळे बाजारात पाण्याची तीव्र टंचाई भासत असल्याचे चित्र आहे. त्यातच पाण्याअभावी पशुपालक पशुधन बाजारात कवडीमोल दराने विक्री करत आहे.