२९ गावांत जलयुक्त ठप्पच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 12:18 AM2018-02-25T00:18:19+5:302018-02-25T00:18:27+5:30
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१७-१८ या वर्षासाठी निवडलेल्या २९ गावांमध्ये अद्याप कामेच सुरू नाहीत. ३० गावात ३० टक्के कामे झालेली असून या गावात त्यापेक्षा कमी कामे झाली आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत २०१७-१८ या वर्षासाठी निवडलेल्या २९ गावांमध्ये अद्याप कामेच सुरू नाहीत. ३० गावात ३० टक्के कामे झालेली असून या गावात त्यापेक्षा कमी कामे झाली आहेत.
जलयुक्त शिवार योजनेबाबत मागील काही दिवसांपासून जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी यंत्रणांना कडक सूचना देत कामांना गती देण्यास बजावले आहे. मात्र तरीही अनेक यंत्रणांची कामे धिम्या गतीनेच होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एकूण ८० पैकी २९ गावांत अजून एकही काम हाती घेतलेले नाही. या योजनेत अवघा ३.८५ कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.
चालू वर्षांत ढाळीच्या बांधाचे २३६ कामे प्रस्तावित असून १९६ कामांच्या निविदा निघाल्या आहेत. १२ कामे सुरू झाली असून, ३८ लाख खर्ची पडले आहेत. सलग समतल चर (हेक्टर संख्या) १३ कामे प्रस्तावित असून ४ कामांच्या निविदा निघाल्या आहेत. खोल सलग समतल चर २७५ कामे प्रस्तावित असून ६१ कामांच्या निविदा निघाल्या आहेत. अनघड दगडी बांध २७, अर्दन स्ट्रक्चर १६, शेततळ्यांची ४५६ कामे प्रस्तावित असून १५५ निविदा पूर्ण झाल्या असून ९० कामे सुरू आहेत. तर ३ लाख खर्ची पडले आहेत. माती नाला बांध ११० कामे प्रस्तावित आहेत. साखळी सिमेंट बंधारा १८५ कामे प्रस्तावित असून ९ कामांच्या निविदा निघाल्या आहेत. २ कामे सुरू असून ३ लाख खर्च झाले आहेत. नाला खोलीकरण/सरळीकरण २०१ कामे प्रस्तावित असून ९६ कामांच्या निविदा निघाल्या आहेत. ४५ कामे सुरू असून ४३ लाख खर्च झाला आहे. रिचार्ज शाष्ट २६९ कामे प्रस्तावित आहेत. ठिबक सिंचन २१५ प्रस्तावित कामे असून ३७५ कामांच्या निविदा पूर्ण झाल्या आहेत. १९५ कामांना सुरूवात झाली असून ७४ लाख खर्च झाले आहेत.
तूषार सिंचन २१६ प्रस्तावित कामे असून ५७५ कामांच्या निविदा पूर्ण झाल्या आहेत. २८८ कामांना सुरूवात झाली असून २९ लाख खर्च झाले आहेत. बंधारे ५०, रिचार्ज ट्रेंच १६, जुन्या सरंचना दुरूस्ती व तळ खो. ५४, नाला खो. रा. व सिएनबी २१ व इतर ३ प्रस्तावित कामांचा समावेश आहे.
जलयुक्त शिवार योजनेत शासनाने नव्याने काही बदल केले आहेत. त्यानुसार आता माथा येथे पायथा अशी जल व मृदासंधारणाचे उपाय अनिवार्य केले आहेत. यापूर्वी या निकषांना तेवढे प्राधान्य दिले न गेल्याने अनेक ठिकाणी खालची कामे गाळल्याचे प्रकार घडत होते. त्यामुळे अशा गावांना या कामांचा जास्त काळ फायदा होणे अवघड आहे. हे टाळण्यासाठी
अधिकाºयांनी अधिक सूक्ष्म नियोजन करण्यास सांगितले आहे. त्या दृष्टीने विचार केला तर आता ही कामे सुरू होणे गरजेचे आहे. फेब्रुवारी महिना संपत आल्याने आता पावसाळ्यापूर्वी केवळ तीन उरले आहेत. त्यामुळे ८० गावे १०० टक्के कामे पूर्ण करून बाहेर काढण्याचे आव्हान आहे.