सेनगावातील समस्यांसंदर्भात गांभीर्याने लक्ष देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:31 AM2021-01-25T04:31:18+5:302021-01-25T04:31:18+5:30
सेनगाव : शहरातील विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच निर्णय घेऊ, निवडणूकीपूर्वी काही समस्या निश्चितच सोडविण्याचे आश्वासन पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी ...
सेनगाव : शहरातील विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी लवकरच निर्णय घेऊ, निवडणूकीपूर्वी काही समस्या निश्चितच सोडविण्याचे आश्वासन पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी सेनगाव येथील कार्यक्रमात बोलताना दिले.
सेनगाव येथील बालाजी मंदिर सभागृहात पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या सत्काराचा तसेच शहरातील नागरिक, व्यापारी यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, तालुका अध्यक्ष विनायकराव देशमुख, माजी जि.प. सदस्य गजानन देशमुख, ओमप्रकाश देशमुख, विक्रम पतंगे, विलास गोरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री यांनी शहरातील व्यापाऱ्यांना काही लोक विनाकारण त्रास देत असतील तर ते सहन करणार नाही. याबद्दल पोलीस प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. अशा त्रास देणाऱ्यांना पोलीस अधिकारी पाठीशी घालत असतील तरीही हलवावे लागेल. तसेच शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, स्मशानभूमी यासह विविध ठिकाणी सामाजिक सभागृह उभारण्यासाठी निश्चितच तातडीने निर्णय घेऊ. येणाऱ्या निवडणुकीसाठी नागरिकांनी पाठीशी उभे रहावे. शहराच्या विकासासाठी लक्ष देणार असल्याचे बाेलताना सांगितले. यावेळी कोविड काळात चांगले काम करणाऱ्या डॉक्टरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रकाश वाघ, अशोक सरनाईक, विजय ठोंबरे, संजय देशात, संजय देशमुख, पंडित देशमुख, प्रभाकर जिरवणकर, अमरदीप कदम, शैलेश तोष्णीवाल, गणेश जारे, गंगाराम गाढवे यांच्यासह अन्य कार्यकर्ते यांनी पुढाकार घेतला.
फाेटाे नं. २५