घोटा (देवी) येथे ज्ञानेश्वर महाराज मूर्तीचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:20 AM2021-07-08T04:20:20+5:302021-07-08T04:20:20+5:30

७ जुलै रोजी घोटा देवी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची मूर्ती नाशिक येथून आणली. ही मूर्ती तीन फुटांची ...

Welcome to the idol of Dnyaneshwar Maharaj at Ghota (Goddess) | घोटा (देवी) येथे ज्ञानेश्वर महाराज मूर्तीचे स्वागत

घोटा (देवी) येथे ज्ञानेश्वर महाराज मूर्तीचे स्वागत

Next

७ जुलै रोजी घोटा देवी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची मूर्ती नाशिक येथून आणली. ही मूर्ती तीन फुटांची आहे. येत्या दोन दिवसांमध्ये मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार असल्याची माहिती कालीदासगुरू शार्दुल यांनी सांगितले.

घोटा देवी येथे मूर्ती आणल्यानंतर, गावकऱ्यांसह भजनी मंडळींनी, महिलांनी मूर्तीचे यावेळी स्वागत केले. याप्रसंगी शिवाजी महाराज नागझरीकर, अमोल पावडे, सुधाकर शेळके, परसराम पावडे, संतोष भाले, भानुदास कुरवाडे, विजय शेळके, आत्माराम पातळे, प्रकाश पावडे, प्रल्हाद बोरकर, वसंतराव पावडे, श्यामराव उगले, रामचंद्र गायकवाड, शालूबाई जगताप, रामाबुवा शेळके, ज्ञानेश्वर पावडे, गोपाल शेळके, प्रल्हाद बोरकर, उत्तम पाटील, श्यामराव उगारे, रामचंद्र गायकवाड, महिला मंडळ शालूबाई जगताप, लक्ष्मीबाई पावडे, शांताबाई शेळके, गंगुबाई पावडे, नंदाबाई गायकवाड, रेणुकाबाई पावडे, लीलाबाई पावडे, मथुराबाई शेळके, लीलाबाई गावंडे यांची उपस्थिती हाेती.

फोटो न. ०१

Web Title: Welcome to the idol of Dnyaneshwar Maharaj at Ghota (Goddess)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.