थकवा येतोय काय करू? रुग्ण घटले, काॅलमध्येही झाली घट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:20 AM2021-06-24T04:20:51+5:302021-06-24T04:20:51+5:30
२३ मार्च २०२० पासून कोरोना महामारीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत होते. यादरम्यान, रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून शासनाने ...
२३ मार्च २०२० पासून कोरोना महामारीचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत होते. यादरम्यान, रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून शासनाने जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागात हेल्पलाइन सुरू केली होती. त्यामुळे त्यावेळी कोरोना रुग्णांची तसेच नातेवाइकांची गैरसोय दूर झाली. या कालावधीत डोके दुखत आहे, सर्दी होत आहे, खोकला वाढला आहे, अशा प्रकारचे काॅल यायचे. यानंतर आपत्ती व्यवस्थापन आलेल्या काॅलची नोंद करून आरोग्य विभागाला त्याची माहिती देत असे. आजमितीस कोरोना आजारासंबंधी येणारे काॅल कमी झाले असून, कोरोना रुग्णांना काही मदत मिळते का? यासंदर्भात येत आहेत. सद्य:स्थितीत कोरोना ओसरत चालला असून, रुग्णसंख्याही घटल्याचे पाहायला मिळत आहे.
प्रतिक्रिया
डोकेदुखी वाढलीय, काय करू?
मला अस्वस्थ वाटत आहे. डोके जड पडले आहे. मी बसू पण शकत नाही. आरोग्य विभागाचा नंबर देता का? म्हणजे मला त्या ठिकाणी जाता येईल.
मी खूप पथ्य पाळले आहे. आज मला वारंवार ताप येतो आहे. गोळ्या घेतल्या तरी ताप काही उतरत नाही. यावर उपाय सांगता येईल का?
माझी सर्दी कमी होण्याचे नाव घेत नाही, डोकेही खूप दुखत आहे, आयुर्वेदिक औषधी घेतली; पण काही उपयोग होत नाही? असेही काॅल या हेल्पलाइनवर येत होते.
जास्त करून ग्रामीण भागातील काॅल
कोरोना महामारीच्या काळात जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागात कोरोना रुग्णांसाठी शासनाने हेल्पलाइन सुरू केली होती. सुरू करण्यात आलेल्या हेल्पलाइनवर शहरी भागाबरोबर ग्रामीण भागातील काॅल जास्त येत होते. आज कोरोना ओसरत चालला आहे. त्यामुळे काॅल येणे बंद झाले आहे. दुसरीकडे कोरोना रुग्णांना काही मदत मिळते का? यासंदर्भातील काॅल मात्र आज येत आहेत.