डेमो रेल्वे सुरु करण्याचे काय झाले?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2021 04:07 AM2021-07-13T04:07:19+5:302021-07-13T04:07:19+5:30
हिंगोली: प्रवाशांच्या सोयीकरीता पूर्णा ते अकोट ही डेमो रेल्वे सुरु करण्याचा रेल्वे विभागाचा माणस आहे. परंतु, रेल्वे विभागाने अद्यापपर्यत ...
हिंगोली: प्रवाशांच्या सोयीकरीता पूर्णा ते अकोट ही डेमो रेल्वे सुरु करण्याचा रेल्वे विभागाचा माणस आहे. परंतु, रेल्वे विभागाने अद्यापपर्यत तरी याकडे लक्ष वेधलेले दिसत नाही. ‘डेमो’ बाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी प्रवाशांची आहे.
कोरोना महामारी ओसरत चालली असल्यामुळे प्रवाशी संख्या वाढल्याचे रेल्वे विभागाचे म्हणणे आहे. कोरोना महामारीच्या काळात २० ते २५ प्रवासी हे प्रवास करायचे. परंतु, आजमितीस १५० ते २०० प्रवासी प्रवास करु लागले आहेत.सद्य:स्थितीत अकोला ते पूर्णा, अमरावती ते पुणे, अजनी ते मुंबई या रेल्वे गाड्या बंद आहेत. रेल्वे विभागाची सूचना येईल त्या पद्धतीने या रेल्वे सुरु गाड्या सुरु केल्या जातील, असे स्टेशनमास्टर रामसिंग मीना यांनी सांगितले.
जिल्ह्यातून जाणाऱ्या विशेष रेल्वे
नरखेड ते काचीगुडा
जम्मूतावी ते नांदेड
जयपूर ते हैदराबाद
तिकिटात फरक किती
साधे तिकीट देणे सध्या तरी सुरु आहे. आजमितीस एक्सप्रेस रेल्वेच सुरु आहेत. केंद्र शासन व रेल्वे विभागाची सूचना आल्यास साधे तिकीट देता येईल. सध्या आरक्षण तिकीटच दिले जात आहे. आरक्षण तिकीटात सोयी-सुविधा मिळतात. साध्या तिकीटात त्या मिळत नाहीत.
साधे तिकीट अजून तरी सुरु नाही...
पॅसेंजर गाड्या सुरु नसल्यामुळे साधे तिकीट सध्या सुरु नाही. एक्सप्रेसला गाडीने प्रवास करायचा झाल्यास आजमितीस आरक्षण करणे आवश्यक आहे. कोरोना महामारी अजून संपलेली नाही, त्यामुळे मास्क घालणे आवश्यक आहे. रेल्वे विभागाच्या जशा सूचना येतील त्या प्रमाणे प्रवाशांना सोयी दिल्या जातील, असे रेल्वे विभागाने सूचित केले.
प्रवाशी काय म्हणतात....
पॅसेंजर गाड्या सुरु नसल्यामुळे नाईलाजास्तव एक्सप्रेसचे तिकीट काढावे लागत आहे. यामुळे खर्चात जास्त वाढ होत आहे. रेल्वे विभागाने पॅसेंजर रेल्वे सुरु करणे गरजेचे आहे, असे प्रवाशांनी सांगितले.
पूर्वी सुरु असलेली पूर्णा-अकोट ही पॅसेंजर सध्या सुरु नाही. त्यामुळे प्रवाशाना अतोनात त्रास होत आहे. शहराच्या ठिकाणी जायचे झाल्यास अवैध वाहतुकीचा साहरा घ्यावा लागत आहे. कधी-कधी दोन-दोन तास थांबावे लागत आहे, अशी कैफियत प्रवाशांनी मांडली.