बस कुठे अडकली, आधीच कळणार; ॲप लाँचिंगचे घोडे कुठे अडले?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:31 AM2021-08-23T04:31:43+5:302021-08-23T04:31:43+5:30
हिंगोली : जिल्ह्यातील हिंगोली, वसमत आणि कळमनुरी आगारांनी ‘व्हीटीएस’ प्रणाली सर्वच बसला बसविली आहे. हे ॲप कधी सुरू करायचे? ...
हिंगोली : जिल्ह्यातील हिंगोली, वसमत आणि कळमनुरी आगारांनी ‘व्हीटीएस’ प्रणाली सर्वच बसला बसविली आहे. हे ॲप कधी सुरू करायचे? याबाबत अजून तरी कोणत्याही प्रकारच्या सूचना वरिष्ठांकडून आलेल्या नाहीत, अशी माहिती एस. टी. महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
गत पाच-सहा महिन्यांपासून व्हीटीएस (व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टम) या प्रणालीचे काम सुरू आहे. चाचणी म्हणून महामंडळात अंतर्गत हे काम सध्या सुरू आहे; परंतु अजून तरी प्रवाशांसाठी हे ॲप सुरू करण्यात आलेली नाही. व्हीटीएस प्रणालीचे काम काही ठिकाणी पूर्ण झाले आहे तर काही ठिकाणी अजून सुरूच आहे. हे ॲप कधी लाँच होणार आहे याबाबत अजून तरी कोणतीही मिळाली नाही.
बस कुठे आहे, हे आधीच कळणार...
व्हीटीएस प्रणालीद्वारे बस कुठे आहे? कुठे थांबली आहे? बसचा वेग किती आहे? किती वेळात बस थांब्यावर येईल? हे कळणार आहे. एवढेच नाही तर चालक-वाहक एखाद्या थांब्यावर थांबले असतील तर ते कशासाठी थांबले आहेत? हे या प्रणालीद्वारे कळू शकेल.
किती बसला बसविली यंत्रणा?
हिंगोली बस ६३
यंत्रे बसविली ६१
वसमत बस ५३
यंत्रे बसविली ५३
वसमत बस ३६
यंत्रे बसविली ३४
अजूनही ‘व्हीटीएस’चे काम सुरूच...
रॉसमेट्रा कंपनीच्या प्रतिनिधींना ‘व्हीटीएस’ प्रणालीचे काम दिले आहे. राज्यातील काही आगारांमध्ये हे काम पूर्ण झाले तर काही आगारात काम सुरूच आहे. एस. टी. महामंडळांतर्गत ‘व्हीटीएस’ची चाचपणी सुरू आहे; परंतु अजून तरी प्रवाशांसाठी ही सुविधा सुरू केली नाही. व्हीटीएस प्रणालीचे ॲप कधी लाँच करायचे, याबाबत वरिष्ठस्तरावर चाचपणी सुरू आहे.
प्रतिक्रिया...
जिल्ह्यातील हिंगोली, वसमत आणि कळमनुरी या तिन्ही आगारांतील १६२ पैकी १४८ बसला व्हीटीएस प्रणाली बसविण्यात आली आहे. व्हीटीएस ॲप महामंडळांतर्गत सुरू असून, अजून तरी प्रवाशांसाठी हे लाँच करण्यात आलेले नाही. महामंडळाच्या वरिष्ठस्तरावर ॲप कधी लाँच करायचे याबाबत विचारविनिमय सुरू आहे.
-सिद्धार्थ आझादे, पर्यवेक्षक, यंत्र विभाग