जिल्ह्यातील नववीच्या वर्गातील ८०० विद्यार्थी गेले कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:39 AM2021-06-16T04:39:20+5:302021-06-16T04:39:20+5:30

हिंगोली जिल्ह्यात गतवर्षी १९ हजार ५१९ मुले नववीत होती. यात हिंगोली तालुक्यात ५३५८, सेनगावात २८९७, वसमतला ४९१६, कळमनुरीत ३९२०, ...

Where did the 800 ninth grade students of the district go? | जिल्ह्यातील नववीच्या वर्गातील ८०० विद्यार्थी गेले कुठे?

जिल्ह्यातील नववीच्या वर्गातील ८०० विद्यार्थी गेले कुठे?

Next

हिंगोली जिल्ह्यात गतवर्षी १९ हजार ५१९ मुले नववीत होती. यात हिंगोली तालुक्यात ५३५८, सेनगावात २८९७, वसमतला ४९१६, कळमनुरीत ३९२०, औंढ्यात २४२८ अशी तालुकानिहाय विद्यार्थीसंख्या होती. यापैकी १० हजार २०१ मुले, तर ९ हजार ३१८ मुली होत्या. मात्र, यंदा दहावीत प्रवेश घेतलेल्यांची संख्या एवढीच राहणे अपेक्षित असताना ती १८ हजार ७१२ वर येऊन ठेपली आहे. यामध्ये हिंगोलीत ५०६१, सेनगाव २८७४, वसमत ४८३६, कळमनुरी ३६७०, औंढा २२७१ अशी तालुकानिहाय दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या आहे. यात मुले ९९०९ तर मुली ८८०३ एवढ्या आहेत. त्यामुळे संख्येत कमी झालेल्यांमध्ये मुले २९२, तर मुली ५१५ एवढ्या आहेत.

जिल्ह्यात नववी पास विद्यार्थी १९५१९

दहावीसाठी अर्ज केलेले विद्यार्थी १८७१२

आर्थिक अडचण, स्थलांतर मुख्य कारण

मागील वर्षभरात अनेकांना वारंवार रोजगार गमावावा लागला. यंदा ऐन शाळा सुरू होण्याच्या तोंडावर कोरोनाचा कहर कमी झाल्याने कामगार स्थलांतर करीत आहेत. त्यामुळे काही प्रमाणात पालकांसमवेत मुले गेल्याचा परिणाम झाला असावा. तर आर्थिक अडचणीत काही जणांनी सध्या तरी शाळेला सोडचिठ्ठी दिली. ग्रामीण भागात कमी वयात मुलींचे लग्न लावतात. बालविवाहातूनही काही मुलींची गळती झाल्याची भीती आहे.

इतर कारणांसह पटसंख्येची बोंब

अनेक शाळांमध्ये शिक्षकांची पदे टिकविण्यासाठी मुलांना नाहक प्रवेश दिला जातो. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असे नाहकचे प्रवेश बंदच दिसत आहेत. शिवाय काही ठिकाणी पटसंख्येचा घोळही असतो. मात्र, दहावीच्या परीक्षा बोर्डाच्या असल्याने तसा घोळ टाळला जायचा. त्यामुळे एरवीही दहावीला विद्यार्थीसंख्या घटते. या कारणांसोबतच दुर्गम भागातील मुलांचे स्थलांतर व इतर कारणेही आहेत. यंदा कोरोनामुळे अनेकांना आर्थिक अडचणीचाही सामना करावा लागत असल्याने पाल्यांसह कामावर गेलेली अनेक कुटुंबे आहेत. ग्रामीण भागात याचा फटकाही काही प्रमाणात दिसतो.

जिल्ह्यात नुकतीच प्रवेशप्रक्रिया सुरू झाली आहे. आणखी विद्यार्थी वाढू शकतात. त्यामुळे आताच हे विद्यार्थी गळाले असे म्हणता येणार नाही. प्रवेशाच्या अंतिम तारखेपर्यंत ही मुले प्रवाहात येऊ शकतात.

-पी.बी. पावसे, शिक्षणाधिकारी

Web Title: Where did the 800 ninth grade students of the district go?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.