नगरपालिकांना दिलेला नियोजनचा निधी अडला कुठे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:21 AM2021-07-10T04:21:39+5:302021-07-10T04:21:39+5:30
हिंगोली जिल्ह्यातील नगरपालिकांना देण्यात आलेल्या निधीचे वितरण त्यांना झाले नसल्याची ओरड म्हणजे पाणी कुठेतरी मुरतेय? अशी आहे. नियोजनकडून मार्च ...
हिंगोली जिल्ह्यातील नगरपालिकांना देण्यात आलेल्या निधीचे वितरण त्यांना झाले नसल्याची ओरड म्हणजे पाणी कुठेतरी मुरतेय? अशी आहे. नियोजनकडून मार्च एण्डलाच निधी वितरण केले जाते. या कामांना प्रशासकीय मान्यता दिल्याने तो प्रश्न नाही. एकट्या हिंगोलीचीच माहिती घेतली तर या ठिकाणचे २०२०-२१ चे ७.५ कोटी रुपये प्राप्त होणे बाकी आहेत. जिल्हा नियोजनमार्फत मंजूर १९ कामांचा एकही रुपया अजून प्राप्त झाला नाही. एवढेच काय तर २०१९-२० मधील एक कोटी अजून दिले नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा निधी आता खर्च कधी करणार? या कामांची पुढील प्रक्रिया कधी करणार? असा प्रश्न आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देऊन हा प्रश्न सोडविला पाहिजे. हा निधी नेमका का अडला? हे तपासून योग्य ती कारवाई न केल्यास वरिष्ठ पातळीवरून लक्ष घालावे लागेल. ती वेळ येणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.