लाच घेताना मुख्याध्यापक जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 12:57 AM2018-04-13T00:57:11+5:302018-04-13T00:57:11+5:30

कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापकाने क्रीडा प्रशिक्षकाच्या मानधनाचा धनादेश देण्यासाठी १२ एप्रिल रोजी चार हजारांची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने मुख्याध्यापकास रंगेहाथ पकडले.

 While taking a bribe, the headmistress Zerband | लाच घेताना मुख्याध्यापक जेरबंद

लाच घेताना मुख्याध्यापक जेरबंद

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
डोंगरकडा : कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथील जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापकाने क्रीडा प्रशिक्षकाच्या मानधनाचा धनादेश देण्यासाठी १२ एप्रिल रोजी चार हजारांची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने मुख्याध्यापकास रंगेहाथ पकडले.
कराटे बॉक्सिंगचे प्रशिक्षकास मुलींचे हजेरीपटावर सह्या करणे, प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र देणे, मानधनाचा नऊ हजारांचा चेक देणे याच्या मोबदल्यात लाच मागितली होती. चार हजार रूपयांवर तडजोड झाली. १२ एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास हिंगोली जिल्हा लाचलुचपत विभागाच्या पथकाने सापळा रचून मुख्याध्यापक विजयकुमार जीवनराव केंद्रे यास चार हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. याबाबत आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि नितीन देशमुख, पोनि जितेंद्र पाटील, पोहेकॉ शेख उमर, अभिमन्यू कांदे ,महारूद्र काबाडे आदींनी कामगिरी केली. शिक्षण क्षेत्रातील मुख्याध्यापकाने लाच घेतल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे.

Web Title:  While taking a bribe, the headmistress Zerband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.