वन्य प्राण्यांचा वावर वाढला ; काेवळ्या पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 04:19 AM2021-07-22T04:19:29+5:302021-07-22T04:19:29+5:30
हिंगोली : जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये वन्यप्राण्यांचा वावर वाढल्यामुळे पिकांचे नुकसान हाेत असल्याने शेतकरीवर्ग चिंतीत झाला आहे. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, ...
हिंगोली : जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये वन्यप्राण्यांचा वावर वाढल्यामुळे पिकांचे नुकसान हाेत असल्याने शेतकरीवर्ग चिंतीत झाला आहे. वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी विभागीय वनाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्ह्यातील खेर्डा, खेर्डावाडी, सिरसम, धोतरा, खानापूर, पातोंडा, आडगाव, लिंबी, लिंबाळा, बेलूरा आदी गावांसह शेत शिवारात रोहिंग्या, हरण, रानडुक्कर, नीलगाय आदी वन्यप्राणी येवून सोयाबीन, कापूस, उडीद, मूग आदी पिकांची नासाडी करीत आहेत. सदरील वन्यप्राण्यांना हाकलण्याचा प्रयत्न केल्यास वन्यप्राणी अंगावर येत आहेत. वन विभागाने या प्रकाराची त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी विभागीय वनाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनावर शशीकांत वडकुते, राजकुमार गडदे, दतराव गडदे, विलासराव मस्के, भागीराव गडदे, सर्जेराव गडदे, शेख रफी शेख इस्माईल, विठ्ठलराव गुळवे, प्रल्हाद कावळे आदी जवळपास ४० शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.