बीडीओवर कारवाईसाठी वादळी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:10 AM2018-06-15T00:10:33+5:302018-06-15T00:10:33+5:30

जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत कळमनुरी येथील गटविकास अधिकारी मनोहर खिल्लारी यांचे मनमानी वागणे अन् कामातील अनियमिततेचा मुद्दा जि.प.सदस्य बालासाहेब मगर यांनी चांगलाच लावून धरला. त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या ठरावावरून सभाही अर्धा तास थांबली होती.

 Windy talk for action on BDO | बीडीओवर कारवाईसाठी वादळी चर्चा

बीडीओवर कारवाईसाठी वादळी चर्चा

Next

हिंगोली : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत कळमनुरी येथील गटविकास अधिकारी मनोहर खिल्लारी यांचे मनमानी वागणे अन् कामातील अनियमिततेचा मुद्दा जि.प.सदस्य बालासाहेब मगर यांनी चांगलाच लावून धरला. त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याच्या ठरावावरून सभाही अर्धा तास थांबली होती.
सभेच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्षा शिवराणी नरवाडे तर सीईओ एच.पी.तुम्मोड, उपाध्यक्ष अनिल पतंगे, सभापती संजय देशमुख, प्रल्हाद राखोंडे, सुनंदा नाईक, रेणूका जाधव, अति. मुकाअ ए.एम. देशमुख यांची उपस्थिती होती. यावेळी मगर यांनी बीडीओ खिल्लारे यांचा मुद्दा लावून धरल्याने प्रशासन हैराण झाले होते. यात कारवाई न झाल्यास सभाही होऊ देणार नाही अन् दिलेले आश्वासन न पाळल्यास पुढे सीईओंच्या दालनाला कुलूप ठोकू, असा इशारा त्यांनी दिला. शेवटी विभागीय चौकशी तर सुरूच आहे. सक्तीच्या रजेचा ठराव आयुक्तांकडे पाठवू. तोपर्यंत अध्यक्ष, सीईओ व उपाध्यक्ष यांच्या नियंत्रणात बीडीओ काम करतील. कार्यालय उपस्थिती वाढवतील, असे ठरले.
विस्थापित शिक्षकांचा मुद्दा पुन्हा एकदा गाजला. शिवसेनेचे गटनेते अंकुश आहेर यांनी या मुद्यावर प्रशासनाला कोंडीत पकडले होते. शेवटी हा प्रश्न येत्या आठ दिवसांत मार्गी लागणार असल्याचे शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के यांनी सांगितले.
यासभेत कुरूंदा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा मुद्दा चांगलाच गाजला. बांधकाम झालेल्या इमारतीचे गुणवत्ता तपासणी करण्याची मागणी वारंवार करूनही ती का होत नाही असा प्रश्न उपस्थित करून सदस्यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याला धारेवर जिप सदस्या रिता दळवी यांनी चांगलेच धारेवर धरले. इतकेच नाही तर या इमारतीतील फर्निचरची निविदा मंजुर झाली. कंत्राटदाराला कायार्रंभ दिले, काम पुर्ण करण्याची मुद्दत तीन महिन्याची असतांना अद्याप कामाला प्रारंभ झाला नसल्याने कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची व कामाला मुद्दत वाढ देऊ नये अशी मागणी सदस्यानी लावुन धरली.
याचबरोबर पाणीपुरवठ्याच्या प्रश्?नावर विठ्ठल चौतमलसह काही महिला सदस्यांनी पाणीप्रश्नावर अधिकाºयांना जाब विचारला असता त्याचे उत्तर समाधानकारक मिळत नसल्याने अनेक सदस्य चांगलेच संतापले. नरवाडी येथील महिला सदस्यांनी पाणी प्रश्?नावर थेट अध्यक्षालाच आमच्या गावाला पाणी कधी मिळणार असा प्रश्?न केला. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.एच.पी.तुम्मोड यांनी पाणीपुरवठ्याचे अभियंता भागानगरे या प्रश्नाचे उत्तर द्या असे सांगीतले. मात्र समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने भागानगरे यांनी आपला पदभार सोडावा अशी संतप्त मागणी सदस्य चौतमल यांनी केली.

Web Title:  Windy talk for action on BDO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.